पोस्को महाराष्ट्र स्टील कंपनीकडून पत्रकारांना KF94 मास्क चे वाटप.

0
पोस्को महाराष्ट्र स्टील कंपनीकडून पत्रकारांना KF94 मास्क चे वाटप.

पोस्को महाराष्ट्र स्टील कंपनीकडून पत्रकारांना KF94 मास्क चे वाटप.

माणगांव-प्रतिनिधी.
माणगांव तालुक्यातील विळे- भागाड एम आय डी सी मधील पोस्को महाराष्ट्र स्टील कंपनी कडून रायगड जिल्ह्यातील पत्रकारांना एकूण 2000 मास्क चे वाटप करण्यात आले प्रातिनिधीक तत्वावर माणगांव येथील पत्रकारांना मास्क वाटप करण्यात आले.
माणगांव येथील माणगांव तालुका पत्रकार सेवा संघाच्या तातडीच्या बैठकीत पोस्को महाराष्ट्र स्टील चे डेप्युटी मॅनेजर किशोर पाटील व संदीप पाटील यांच्या उपस्थितीत उतेखोल येथे मास्क वाटण्यात आले यावेळी भारतीय पत्रकार संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व आपत्ती व्यवस्थापन तज्ञ प्रा.जयपाल पाटील,मा.ता पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अरुण पोवार, तालुकाध्यक्ष रविंद्र कुवेसकर उपस्थित होते.

पोस्को कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्वातुन रायगड जिल्हावासियांकरिता एकूण २ लाख KF94 कोरियन बनावटीचे मास्क वाटण्यात आले.त्यापैकी १ लाख मास्क हे कंपनी व्यवस्थापनाकडून रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले व ३० हजार मास्क हे पोलीस अधीक्षक रायगड यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले,व उर्वरित ७० हजार मास्क चे वाटप जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालये, लोकाभिमुख कामे करणाऱ्या विविध सामाजिक स्वयंसेवी संघटना, तसेच विविध पत्रकार संघटना यांना एकूण २हजार मास्क चे वाटप करण्यात येत आहे अशी माहिती पोस्को कंपनीचे डेप्युटी मॅनेजर किशोर पाटील यांनी उपस्थित पत्रकारांना दिली.
कोरियन बनावटीचे असलेले मास्क उच्च प्रतीचे ,चांगल्या गुणवत्तेचे,उच्च किंमतीचे आणि कोरोना संक्रमणापासून आपला बचाव करण्यासाठी अतिशय उपयुक्त असल्याचे देखील कंपनी व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले आहे.

Leave A Reply

Please enter your comment!
Please enter your name here