पायवाट !

0
पायवाट !

पायवाट !

पायवाटीच बरे
चालतात हे पाय,
डांबरीवर माझे
दुखतात हे पाय!१

नागमोडी वळणे
गवता गवताने
स्पर्श तो गवताचा
घेतलाय स्वतःने!२

पायवाट जणू ही
धमणीच गावाची
चर्चाच ती असते
तिच्याच हो नावाची!३

पायवाट सांगते
पावलांचीच भाषा
पहाताच अंदाज
पुसटशा त्या रेषा!४

वस्तीवस्तीगणिक
दिसे पाऊलवाट
चाला एकदा तिथे
पहाण्या तिचा थाट!५

** कृष्णा दामोदर शिंदे .

Leave A Reply

Please enter your comment!
Please enter your name here