निशाणी !

0
निशाणी !

निशाणी !
सोडून निशाणी
मला तू चालला,
देशसेवेसाठी
भला तू चालला!१
गर्भ पोटी तुझा
मिरवत आहे,
तुझ्या नावे घास
भरवत आहे!२
वंश तुझा दिवा
पेटवलाय मी,
अंश तुझा नवा
उठवलाय मी!३
बाळ हे आपले
प्रेमाची खबर,
तुझ्या या शौर्याची
बांधीन बखर!४
तू सिंहासारखा
डरकाळी फोड,
दुश्मनांची सार्या
हड्डी हड्डी तोड!५
*कवीवर्यतथाशीघ्रकवीश्रीकृष्णादामोदरशिंदे

Leave A Reply

Please enter your comment!
Please enter your name here