नतीजा – बिंदूची एकमेव नायिका

0
नतीजा - बिंदूची एकमेव नायिका

नतीजा – बिंदूची एकमेव नायिका

१९६२ सालच्या अनपढ या सिनेमात सहनायिका म्हणून पदार्पण केलेली बिंदू देसाई सौंदर्य, सौष्ठव आणि अभिनय असूनसुद्धा नायिका म्हणून प्रस्थापित होऊ शकली नाही. सुरवातीला काही किरकोळ भूमिका केल्यानंतर १९६९ सालच्या ‘दो रास्ते’ मध्ये तिने जबरदस्त खलनायिका साकारली आणि नंतर तीच तिची ओळख झाली. मादक सौंदर्य आणि नृत्याचं उत्तम अंग असलेल्या बिंदूला प्रमुख नायिका होण्याचं भाग्य कदाचित एकाच सिनेमात लाभलं. तो सिनेमा होता १९६९ सालचा नतीजा.

त्या वर्षीच सुनील दत्तने त्याच्या भावाला, सोम दत्तला लॉंच करण्यासाठी निर्माण केलेल्या ‘मन का मीत’ या सिनेमातून नायिका म्हणून लीना चंदावरकर आणि खलनायक म्हणून विनोद खन्ना यांना हिंदी पडद्यावर संधी दिली होती. विनोद खन्नाचा नतीजा हा दुसराच सिनेमा. त्यात तो बिंदूचा नायक होता. हा एक क्राईम थ्रिलर होता आणि के एन सिंग, ज्युनियर महमूद, हेलन वगैरे मंडळी त्यात होती. हा सिनेमा फारसा कोणाच्या लक्षात नाही. पण राजेश नंदा दिग्दर्शित हा एक बऱ्यापैकी ड्रामा होता.

खलनायिका बिंदूचा ती नायिका असलेला हा एकमेव सिनेमा असावा. नायक विनोद खन्ना याचाही हा एकमेव ब्लॅक ॲन्ड व्हाईट सिनेमा असावा. नवे नायक नायिका असले की चांगले सिनेमेही विस्मृतीत जातात याचे हा सिनेमा म्हणजे उत्तम उदाहरण म्हणावे लागेल. यूट्यूब आणि ॲमेझॉन प्राईमवर उपलब्ध असलेला हा सिनेमा एकदा नजरेखालून घालण्यास हरकत नाही.

©️ पराग खोत
१५ नोव्हेंबर २०२०

Leave A Reply

Please enter your comment!
Please enter your name here