धर्माची क्रांती सावळ्या छायेत

0
धर्माची क्रांती सावळ्या छायेत

धर्माची क्रांती सावळ्या छायेत

धर्माची लेक म्हणजे आडदांड, बालीश,हुशार बापाची एकुलती एक,लाडाची लेक तिला पाहुन गाव धर्माच कौतुक करायचा सुरवातीला धर्माला वाटत होते. आपल्याला मुलगा असवा पण नियतीला ते नको होते.कारण तिला क्रांती घडवायची होती. मुलगा मुलगी या दुहेरी रूपात असच म्हणाव लागेल.धर्माच्या बायकोला गंभीर आजारान ग्रासले अन मुलगा असावा या धर्माच्या स्वप्नाला ग्रासले.धर्मा पुढे नातेगोत्यातला सगे सोयरे रोज नाना कल्पना मांडुन ग्रासत होते.कोणी तर पोटी जन्माला आलेल्या कन्येचा व धर्माच्या वयाचा विचार न,करता मुलगी द्यायला तयार होत होते.

धर्मा म्हणजे उथळ पाण्याचा खळखळाट नव्हता.तो विचार करित होता.मुलगी झाली म्हणुन काय झाल.मुलगा तरी कुठ चौपाळ्यावर बसवुन झोके देणार आहे.गेला तो काळ श्रावण बाळान कावडीत बसुन आई वडीलाला न्यायचा,प्रत्यक्षात पांडुरंग आला तरी आई वडीलाची सेवा भक्त पुंडलिकाने सोडली नाही.समजा मुलासाठी आपण केलीच दुसरी बायको तर शेवटी या क्रांतीला सावत्र लेक म्हणुन सांभाळील.मुलगा झाला तर त्याच कौतुक पाहुन नाही म्हटल तरी क्रांतीच्या आईचा जीव झुरतच राहणार,असे नाना प्रश्न त्याच्या पुढे तयार व्हायचे,शेवटी या नाना प्रश्नाचे एकच उत्तर त्यान शोधुन काढल.ते होत क्रांतीला मुला सारख संभाळायच,एका अपत्यावर ते हि एका मुलीवर राहण्याची क्रांती आपण करायची

क्रांतीची घोडदौड सुरू होती इंग्रजी,हिन्दी,मराठी म्हणु नका माधुरी सर्व शिकली होती.त्यातहि तिने धर्माच्या वैचारीक क्रांतीला साथ देण्यासाठी,समाजिक मानस शास्रात पी एच.डी केली.
नांगरटीला दोन बैलाचा जोड असावा अशी ती वडीला बरोबर शेतीवाडीची सारीच काम करू लागली.धर्माची आक्का आजारी असल्याचा संदेश आला.धर्माला शेतातली सोंगणी अर्धवट टाकुन हालता येईना.मजुर एकदा गेले की,परत दहाबारा दिवस मिळणार नाय.तो म्हणाला,क्रांती तुच जा आत्याच्या गावला,घोड्यावर जाशील पर ऊन हे अस त्या परीच तट्ट्याची बैलगाडी घेऊन जा. क्रांतीची बैलगाडी किरकिट वाडीच्या जवळपास आली.तोच एक गावजान्या खोंड नेहमी प्रमाणे.या बैलगाडीवर धावला.तो बैलाला टक्कर देणार व गाडी उलटवुन टाकणार तोच माधुरीन बैलगाडीतुन प्रसंगावधान राखुन उडी मारली.हातात बैलासाठी घेतलेली हिरव्या घासाची पेंडी त्या येणार्‍या खोंडा समोर धरली. हम्मा हो,हम्मा करीत ती त्या खोडा समोर घासाची पेडी धरून चूचकारू लागली.

खोंड ज्या गतीने दुरून धावत येत होता.त्याच गतीने सावळा पर येत होता.काही सेकंदाच्या फरकान खोंडान बाजी मरली.पण आता तो शांत झाला होता.त्या घासाच्या पेंडीला तोंड त्यान लावल होत.तर क्रांती त्याच वशिंड खांदा गळ्या खाली लोंबणार मांसल पोळ होतान चोळत होती.खोंड शांतपणे क्रांतीच्या हाताला चाटत होता.जणु जन्माला आल्यानंतर बालपणी आईन वात्सल्यान चाटल तसा मायेचा हात क्रांती आपल्या अंगावरून फिरवित आहे.असच खोंडाला वाटत होत आजवर आग्या वेताळा सारखा धावुन जाणारा खोंड एवढा शांत झालेला पाहुन गावकरी पण आश्चर्य चकित झाले होते. प्रसंगावधान राखुन खोंडाला शांत केल्यामुळे अनेक जण खोंडाच्या जवळ जाऊन त्याला गोंजारू लागले.

तो आता जान्या खोंड राहीला नसुन गाईचा एक बछडा झाला होता.गावकरी आता खोंडाच अन क्रांतीच कौतुक करीत होते.तर आपला जीव वाचवण्यासाठी जिवाची पर्वा न करता वाऱ्याच्या वेगाने येणार्‍या सावळ्याकडे ती एकटक पाहत होती.दुसर्‍या दिवशी सकाळीच पुन्हा माधुरी खोंडाजवळ गेली.हातात हिरवा चारा होता व पाण्यासाठी एक बादली तिने खोंडाच्या समोर ठेवली ती खोंडाला गोंजारीत होती.गावकरी पर आता खोडाला गोंजारू लागले.सांजच्याला गावकर्‍यांन तिचा सत्कार ठेवला
त्याच वेळी समोर दिसणाऱ्या सावळ्यालापर तिने बोलवुन शेजारी बसायला सांगितल.

ती सांगु लागली.जस मी माझ्या गावच नाव राखल तस तुमच्या गावच नाव पर या सावळान राखल खोंड समोर येतो पाहत,तो वाऱ्याच्या वेगान आला.माझ्या युक्तीन खोंड आकळला नसता तर याने शक्तीने माझा जिव वाचवलाच असता.हि खात्री मला पटली होती.म्हणुन मी धाडस केल.याचा आधार दिसला नसता तर मी देखील गांगरून गेले असते त्या खोंडाच्या टक्करीतुन जगले असते की,नाही हे सांगता येत नव्हत.तस घडल असत तर माझा बा जन्मभर गावाला दोष देत राहिला असता.आता जन्मभर गावाच कौतुक करीत राहिल ते केवळ या सावळ्यामुळेच

माझ्या या सन्मानावर सावळा याचा पण हक्क आहे. त्याला मानपान द्या.ती सहज बोलुन गेली.प्रत्येक पुरूषाच्या यशा माग एका स्रीची साथ असते पण येथे एका स्रिच्या यशा मागे एका पुरूषाची साथ आहे हे वास्तव आहे.ती सहज बोलुन गेली.पण तिच्या बोलण्याने गावकर्‍यांच्या मनात वेगळीस खसखस पिकली सावळा पर हुरळून गेला होता.तो त्याच वाऱ्याच्या वेगाने घरी गेला.कसा गेला कसा आला हे त्याच त्यालाच कळल नाही त्याला काहीच कळत नव्हत.भावनेत तो बुडाला होता.कुस्तीच्या दंगलीत त्याला मिळालेल सोन्याच कड त्यान क्रांतीच्या हातात घातल
होत.त्याच्या भावना दाटुन आल्या होत्या.समोर कुठ तरी आपण बसलो होतो.एवढ्या गर्दीतुन तिन आपल्याला बोलवल शेजारी बसवल.

खर तर त्याच नाव त्याच्या बान यशवंत ठेवल होत पण त्याच्या सावळ्या रंगान ते कानामागे टाकले गेल होत.एरव्ही सावळ्या म्हणणारा गाव,आता सावळाराम पहिलवान म्हणत होता.एवढा मान तिने एका घटकात मिळवुन दिला.त्याच्या पुढे त्या सोन्याच्या कड्याची काय किम्मत,आत्याची सेवा करण्यात चारदिस कसे गेले. हे तिला कळले नाही.आत्याचा लळा अन समोर सावळा तिचा पाय परतीच्या प्रवासाला निघत नव्हता.त्यातच तिला जाणिव झाली.पाहुणा एक दोन दिसाचा, आपण तर चार दिस काढले.अस वागलो तर आजचा मान उद्या राहिल का?

ती निघाली निघताना तिने खोडाला लावलेला लळा अन सावळ्याला दाखवलेला जिव्हाळा याला दोघे जागले होते.ते तिला पोहचायला वेशी पर्यत आले. पंधरावीस दिस गेले.भावाला स्वतः येता आल नाय म्हणुन म्हणुन लेकीला पाठवल तिने आपली सेवा केली.त्याची जाण आपण ठेवली पाहीजे.गावान पोरीच कौतुक केल.हे इतरान सांगण अन आपण आपल्या मुखान सांगण यात फरक आहे धन्याला घेऊन गाडीबैल जोडुन निघाव तिन ठरवल.पण नियतीच्या मनात वेगळच होत. गाडीच्या धुऱ्यावर करून शिवळात बैलाची मान अडकवावी तेवढ्यात तुका आला अर सदा उद्या तारीख आहे. भिकान वावराचा बांध दोन्ही अंगान कोरला होता त्याची,तवा तु अन मी गेलोच पाहीजे.

मोठ्या उत्साहात आवडा निघाली होती.दाराकड परत वळणार तोच सावळाकड पाहुन सदान डोक खाजवल अन हाळी दिली.अर सावळा आवडा मामीला घेऊन जातो का,तिच्या भावाकड निघाली हे ऐकताच मनात मायंदाळ होत पर एकदम उतावीळ आहे कस दावायच म्हणुन त्यान थोडावेळ शिवळात मान अडकवणाऱ्या बैलान मान हलवित राहव तस केल.अन आता मामीला घेऊन जायच म्हटल्यावर नाही तरी कस म्हणायच म्हणत तो धावतच कापड बदलायला गेला.

मामी माहेरी चालली म्हणजे एखादा दुसरा दिस राहणारच म्हणुन त्यान थैलीत एक कपड्याचा जोड घेतला त्याच्या डोळ्यापुढ क्रांतीचा अन त्याचा कपड्याचा जोड फिरत होता. मामी उंबराच फुल दावायला घेऊन चालली.चांगली येळ तिन साधुन आणली.खुळु खुळु घुंगराचा ताल ऐकताच क्रांती जोरात ओरडली आबा आत्याची गाडी आली.म्हातारा मामा काय बैल दटावताना दिसत नव्हता. म्हणुन तिन निरखुन पाहिल. क्षणभर तिच्या डोळ्यावर विश्वास बसेना मनी वसे ते स्वप्नी दिसे अशी तिची स्थिति झाली.तो पर्यत सावळ्यान उडी टाकली.अन बैल आकळून धरली.धुऱ्याला हात लावु बैलाची शिवळ काढली .

तो पर्यत धर्मा समोर आला होता राम राम मामा म्हणत सावळा जवळ जवळ पायाशी वाकला. त्याला नखशिखान्त न्याहाळत धर्मान त्यांच्या रक्ता भिनलेले संस्कार पाहीले.क्रांतीची लगबग. उडाली होती.आत्याला आधी पाणी द्याव का,सावळाला आधी या विचारात असताना कोणत्याहि कार्यात पुरूषाच्या आधी बसलेल्या पंक्ती तिच्या समोर तरारल्या मग पाण्याचा तांब्या असलेला तिचा हात सावळ्याकडे आपसुक वळला.पुन्हा एक तांब्या माधुरीच्या हातुन घ्यावा.म्हणुन बंधाऱ्यात त्याच्या क्षमतेपेक्षा अधिक पाणी साचले जावे.अशी त्याच्या पोटाची स्थिती झाली.

दोन दिवस गेले.तिसऱ्या दिवशी निघाची तयारी झाली.थांबण्याचा काही तरी बहाणा करावा.म्हणुन तोच सावळा म्हणाला,आता जवळ आलोच तर पल्याडल्या गावात माझा वर्ग मित्र राहतो. सायकलवर पटकन जातो अन त्याला भेटुन येतो.म्हणत त्यान धर्माची सायकल हाती घेतली. सावळ्याच शिक्षण किती झाल हे जाणुन घ्यायची आयती संधी चालुन आली म्हणुन धर्मान विचारल, कोणत्या वर्गात शिकत होता तुम्ही तसा भाबडेपणान सावळा म्हणाला,सहावी सातवी अन आठवी,पुढ काय

तसा हसत सावळा म्हणाला पुढ शिकलो ना,कान अधिर ठेवुन धर्मा ऐकु लागला.सावळा सांगु लागला पुढ शिकलो आठ बैलाचा नांगर,वखर,औत,कोळप चालवा सावळ्याच्या शैक्षणिक पात्रतेची जंत्री धर्मान मनात जपुन ठेवली. त्या दोघाचे दोन दिस एक दुसर्‍याच्या अगदी जवळ जात असलेले पाहुन धर्मा जे स्वप्न पाहिल होत.पण हाताशी आलेल पीक धो धो पडणाऱ्या पावसात वाहत जाव तस आठवी ऐकताच धर्माची पुर्ण शेतीच वाहुन गेली होती.धर्मा खळ्यात खाडखुड करीत होता.सावळा टांग मारून गेला होता.आई अन आत्याला बोलत कराव,म्हणत क्रांती म्हणाली,काय आत्या सावळ्या दारू पितो म्हणत होते गावातले लोक,तशी आत्या चिडुन म्हणाली अग काय ते कोल्ड्रिंक काय म्हणत्यात ते चहा पर तो पीत नाय तर दारू कुठली तांब्याभर दुध पितो जोर बैठका मारतो.अग नसल पीत पर लोक म्हणत होते अट्टल जुगारी.हाय म्हणुन.

आता आत्याच्या लक्षात आल व्हय व्हय,जुगारी हाय,दारूड्या हाय,तमाशाला पर जातो. आपल्याला काय करायच त्याच, आता आहे आमचा बांधभाऊ पण आम्ही कशाला घाणीकड लक्ष देऊ.नाना कला अन बारागावच पाणी प्यालेली क्रांती म्हणाली,आत्या तुला तरी काय कळत का नाय,असा जुगारी, दारुड्या,तमाशाला जाणारा गाडीवान तु घेऊन आली.तशी आत्या म्हणाली,आम्हाला चालतो पर तुला काय करायच तुला थोडच त्याच्या हाताखाली नांदायच,क्रांती आता निर्भिड झाली होती,ती म्हणाली,मी नांदायच ठरवल तरी तुम्ही नांदु देणार हाय का?

तशी आत्या म्हणाली,अग तु एवढी शिकली त्यान आठवीत शाळा सोडली.तस क्रांती म्हणाली आत्या अग मी शेतकरीच नवरा कराचा ठरवल हाय,आता तुच सांग जास्त शिकलेला शेती करील का,तो शहरात जाऊन कंपनी नाय,तर सरकारी कारकुनगिरी करील,त्याला हि काळी आय गोठ्यात हंबरणारी गाय ते पहाट कोंबड्याच आरवण त्याच बरोबर सुर्याच येण,पाखराचा तो कलकलाट त्याला कळल काय,

आत्याला काहीच कळेना कुठुन बुध्दी आली अन त्याला घेऊन आले तशी क्रांती म्हणाली,तुला कुठुन आली मला माहीत नाही पण त्या दिवशी त्यान स्वतःच्या जिवाची पर्वा न करता कोण कुठली मी मला वाचवायला तो जिवावर उदार झाला होता. तेव्हाच मला बुध्दी आली काही नाते नसताना केवळ माणसाच नात जपण्यापायी यांच्या बरोबर जर नात जडल तर तळहाताच्या फोडासारखा संभाळणार स्री जातीला काय पाहीजे.आता क्रांतीची हि बुध्दी आत्या भावाच्या डोक्यात उतरवित होती.इकडे ऊन उतरल्यावर कडुस पडायला लागल्यावर सावळा आला

तमाशाच्या सोंगाड्यागत तो मामी चला लवकर तुम्ही आवरून बसला का नाय.तशी मामी हासत म्हणाली,सोंगाडे मावशे मी निघाले होते ग,पर त्या भाऊराया किसन देवान वाट अडवली माझी,आता त्या तरण्या गवळणीन तुझी वाट अडवु नये,म्हणजे झाले.आत्याची हि म्हातारी गौवळण क्रांती अन सावळ्याला बरच काही सांगुन गेली.दिव्याचा लखलखाट झाला होता.त्या प्रकाशात कालवणावर आलेली र्तरी चमकत होती.हं पाव्हण चुरा आता पर हे दोन टांगी नाय बर एक टांगीच हाय तशी माधुरी हसली अन पळीतल भरलेल वांग सावळ्याच्या ताटात वाढता वाढता हसत म्हणाली, एकटांग हाय वांगवांग सावळ्या आता रूळला होता.

हे व्हय एक टांगी आमच्याकड तर याला ढेरपोट्या डांगर म्हणत्यात बर हाय,बारा कोसावर भाषा बदलती.धर्मान हेरल पुस्तकी.ज्ञान नसल तरी याला व्यवहारी शेतीच ज्ञान दिसत.महिन्याच्या महिन्याला पगारा खाव अन सुगीच वर्षभर पुरवुन खाव यात काय फरक हाय सुगीत पोर पोटाला पोटभर तर खाईल.याची पोटभर खाण्याची काय सोय आहे हे खडा टाकुन पहाव हा विचार करून धर्मा म्हणाला,पाव्हण जमीन जुमला काही,आहे का, सावळा म्हणाला हाय पर अन नाय पर कागदावर हाय पण बा म्हणतो मालमत्ता हि नितीमत्तावर पाहिजे.अन पुढ इचाराल ते कुळमुळ तर ९६ कुळ हाय का, नाय माहित नाय पर कुळ मात्र आहे.त्याच हे कोड्यातल बोलण ऐकुन धर्माच्या त्याच्या तोंडाकड पाहत राहिला तस सावळान तोंड उघडल आमचा धनी त्यांची शे सव्वासे एकर जागा होती.पोर सारीच विकायला लागली.

तसा त्यांचा बा म्हणाला अर एक घास बत्तीस वेळा चावावा लागतो तसा घास चालण्यासाठी हि बत्तिस एकर तरी ठेवा.पोरानी विचार केला एवढ विकुन हि आपल पोट भरत नाही तर बत्तीस एकर विकुन कुठ पोट भरणार त्यांनी त्यांच्या बान हक्क सोडला कारण.आमच्या आज्यापासून तीन पिढ्या तिथ राबतो.ते कुळ आमच्या नावावर हाय तरी बा म्हणतो नितीमत्तेन नको, आपल्याला हे पर नियतीन दिल मुळ मालक गेला.पोरानी लेखी दिले.असा आहे,जमीन जुमला!क्रांती हळूच म्हणाली मला नको जमीन जुमला!तुच हवा मला!मिया बिबी राजी तो क्या करेगा काझी,क्रांती जरी मानसशास्त्र शिकली होती तरी क्रांतीच मानसशास्र धर्मा बालपणापासुन शिकला होता तिची दुरदृष्टी व बाजिंदपणा

निरोप घेऊन आत्या सावळा निघाले.दोघे म्हणाले येतो आम्ही तसा धर्मा म्हणाला या पर एकटे येऊ नका,तुमच्या बापाला अन घरादाराला घेऊन या,सावळा धर्माच्या तोंडाकडे पाहत राहिला तसा धर्मा क्रांतीकडे पाहत म्हणाला हे कुळ पर तुमच्या नावावर करतो.सुपारी फोडायलाच या.सावळा लाजला परत गावाकडचे घेऊन यायचे म्हणुन बैल गावाकडच्या वाटेन जोरात पळत निघाले.पुढ जात असताना एक दुसर्‍याकड पाहुन आनंदाने हात हालवित होते. कारण लवकरच एकमेकाचा हातात हात घेणार होते.धर्मान क्रांतीला जन्म दिला होता.अन क्रांतीने ग्रामक्रांती जोपासली होती सावळ्याच्या अन सावल्याच्या छायेत
—————————————-आण्णा धगाटे जेष्ट साहित्यिक/ सामाजिक कार्यकर्ता पुणे

Leave A Reply

Please enter your comment!
Please enter your name here