देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात राजकारण, समाजकारण आणि धर्मकारण याचा अजोड दुवा म्हणजे लोकमान्य टिळक

0
देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात राजकारण, समाजकारण आणि धर्मकारण याचा अजोड दुवा म्हणजे लोकमान्य टिळक

देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात राजकारण, समाजकारण आणि धर्मकारण याचा अजोड दुवा म्हणजे लोकमान्य टिळक; ना.डॉ.नीलमताई गोऱ्हे

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्ताने उपसभापती नीलमताई गोऱ्हे यांचे लोकमान्य टिळक प्रतिमेस अभिवादन

पुणे, २३ जुलै २०२१: सार्वजनिक पद्धतीने शिवजयंती आणि गणेशोत्सव साजरा करण्याच्या संकल्पनेने घरा घरात लोकशक्ती उभी केली त्याबद्दल हे अभिवादन आहे. त्याचबरोबर देशाच्या स्वातंत्र्यलढ्यामध्ये राजकारण, समाजकारण आणि धर्मकारण याचा अजोड दुवा लोकांच्या मनात प्रज्वलित करण्याचे काम लोकमान्य यांच्या काम आणि साहित्यामुळे झाले आहे. त्याचबरोबर दै.केसरी परिवार, टिळकांचे सर्व कुटुंबीय, वाचनालय हे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामधील अविस्मरणीय जतन देखील या केसरी वाड्याच्या वास्तूत आहे. विधानपरिषदेचे सभापती म्हणून जयंतराव टिळक यांनी एतिहासिक काम बजावले महाराष्ट्रात पहिली महिला उपसभापती म्हणून मला स्थान मिळाले म्हणून सर्व समाज सुधारकांना वंदन करून डॉ.नीलमताई गोऱ्हे यांनी लोकमान्य टिळकांच्या विचारांनुसार काम करण्याचा संकल्प यावेळी केला.

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्ताने महाराष्ट्र राज्याच्या विधानपरिषद उपसभापती ना.डॉ.नीलमताई गोऱ्हे ह्यंनी नारायण पेठ ‘केसरी वाडा’ येथील लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या प्रसंगी त्या बोलत होत्या. अभिवादनाच्या वेळी शैलेश टिळक (अध्यक्ष, लो. टिळक विचार मंच), कुणाल टिळक, संजय मोरे (शिवसेना,शहर प्रमुख), रामदास नेहुलकर (सहसंपादक केसरी), संगिता ठोसर (नगरसेविका) आंनद गोयल (उपशहर प्रमुख), रविंद्र खेबुडकर, सुदर्शना त्रिगुनाईत, प्रशांत राणे, सुरज भोंडेकर(अॅडमिन केसरी) आदि मान्यवर उपस्थित होते.

डॉ गोऱ्हे म्हणाल्या, गुरू मुळे जिवनात मार्ग दिसत असतो आणि आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे आपले आराध्य आई- वडील, आध्यात्मिक गुरू, श्री गुरूदत्त, अक्कलकोट स्वामी, श्री गजानन महाराज, श्री गोंदवलेकर महाराज, श्री शंकर महाराज, श्री भालचंद्र महाराज, श्री. स्वामी समर्थ या थोर गुरूपरंपरेला वंदन करते. शिवसैनिकांंचे गुरू वंदनीय स्व. बाळासाहेब ठाकरे यांच जरी आज दर्शन होऊ शकत नाही तरी त्यांनी दाखवला मार्ग देशप्रेम, अस्मिता, अभिमान या संपल्याचे संस्कार आम्हाला दिले त्याबद्दल यांना वंदन करते.

Leave A Reply

Please enter your comment!
Please enter your name here