दिव्यांगाना अपंगत्वाचे प्रमाणपत्र बारामतीत मिळणार.

0
दिव्यांगाना अपंगत्वाचे प्रमाणपत्र बारामतीत मिळणार.

दिव्यांगाना अपंगत्वाचे प्रमाणपत्र बारामतीत मिळणार.

दिव्यांग व्यक्तींना आपल्या अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ससून हॉस्पिटल पुणे येथे जावे लागायचे बरेच हेलपाटे ही मारावे लागायचे आणि मग दिव्यांग व्यक्तींना याचा फार त्रास व्हायचा यामुळे काही जण पुण्याला जाणे सुद्धा टाळत असत आणि प्रमाणपत्राच्या माध्यमातून मिळणाऱ्या लाभापासून वंचित राहत असत यामध्ये गोरगरीब वर्ग मोठ्या प्रमाणात आहेत ही बाब पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल कार्याध्यक्ष श्री नितीन दादा शेंडे आणि पुणे जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद महाराष्ट्र शासन अशासकीय सदस्य प्रमोद जाधव यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार आणि पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिली त्यांना या गोष्टीचे गांभीर्य कळाल्याने तातडीने यात सुधारणा होऊन आता दिव्यांगांना तालुक्याच्या ठिकाणी सरकारी दवाखान्यांमध्ये हे दाखले मिळण्याची व्यवस्था करण्यात आली आहे…

बारामती तालुक्यात असे दाखले मिळायला सुरुवात झाली असून पहिला दाखला मळद तालुका बारामती येथील 100% अंधत्व असणाऱ्या रोशन वसंत जाधव यांना मिळाला आहे या प्रमाणपत्राचे मळद ग्रामपंचायत कार्यालय येथे पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल कार्याध्यक्ष नितीन दादा शेंडे यांच्या हस्ते देण्यात आले याप्रसंगी पुणे जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद अशासकीय सदस्य प्रमोद जाधव मळद गावचे सरपंच योगेश बनसोडे बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष रामचंद्र मदने माळेगाव येथील सामाजिक कार्यकर्त्या सोनाली योगेश शहा नेहा संग्राम शितोळे लालासाहेब गावडे सुनील सुभेदार नाना गावडे ग्राम विकास अधिकारी सुनिल पवार आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. शासकीय महिला रूग्णालय बारामती येथे महिन्यातून एकदिवसीय कॅम्प घेतला जाणार असून या मध्ये दिव्यांग व्यंक्तिच्या तपासणी व नोंदणी करून त्यांच्या मध्ये असणार्‍या अपंगत्वाच्या टक्केवारी नुसार प्रमाण पत्र मिळणार आहे अशी माहिती प्रमोद जाधव यांनी दिली.

Leave A Reply

Please enter your comment!
Please enter your name here