दिवाळीत मुलांना देणं शिकवू या !

0
दिवाळीत मुलांना देणं शिकवू या !

दिवाळीत मुलांना देणं शिकवू या !

कद उँचा तो कर लोगे उँचे रखो विचार,
दानधर्म जो ना सिखा जीवन है बेकार ।
दिवाळी हा हिंदूधर्मातील सर्वात मोठा सण. सर्वांची दिवाळी साजरी व्हावी यासाठी सर्वच जण आपल्या पुरते तर काही जण दुस-यापुरतेही प्रयत्न करतात कर्मचा-यांना बोनस, विंâबहुना सफाई कर्मचारी ते इतरही सेवा देणा-यांना श्रीमंत लोक भेटवस्तू, रोख रक्कम, फराळ व मिठाई वगैरे साहित्य देतात.
दिवाळीच्या सुट्ट्यात काही वेगळे करायचा विचार अनेकांचा असतो. त्याला अनुसरुन कृतीही केली जाते. त्यात आनंद घेवून व देवून समाजकार्य केले जाते. असाच एक नविन विचार की या दिवाळीत मुलांना ‘देणं’ शिकवू या!
आपली मुले दान, मदत, सहकार्य, मान, सन्मान, मोठ्यांना आदर देती झाली पाहिजेत त्यांच्यात नम्रपणा, आवाजात माधुर्य, मन जिंकणारी त्यांची वागणूक असली पाहिजे तर समाजातील गोरगरिब व गरजूंना देणं लागतं हा भाव त्यांच्यात निर्माण झाला पाहिजे. आणि हिच खरी माणुसकी आहे. हाच मानवधर्म आहे.

सद्यस्थितीत अपवाद वगळता आपली मुले पूर्णपणे फक्त अन् फक्त घेण्याच्या मोडमध्ये (अवस्थेत) असतात. कारण त्यांच्या पहिल्या वाढदिवसापासून नेहमीसाठी आपण त्यांना घेणं शिकवतो. चॉकलेट, केक, गिफ्ट, याची अपेक्षा तर वयानुसार डॉल, खेळणे, ड्रेस, सायकल, मोबाइल, उच्च दर्जाचे मोबाईल, मोटारसायकल, इथपर्यंत अपेक्षा वाढत जातात. चांगल्या गुणाने उत्तीर्ण झाला तर ‘हे देवू ते देवू’ चे आश्वासन व त्याची पुर्तता करणे, यामुळे त्यांची अपेक्षावृत्ती वाढते. मुले प्रत्येक वाढदिवसाला व प्रसंगाला, सणासुदीला फक्त अपेक्षा ठेऊन घेण्याच्या अवस्थेत (रिसीव्हिंग मोड) येतात.

दुसरे मोठे नुकसान म्हटले तर यामुळे मुले जिद्दी बनतात. क्रोध करणे शिकतात, अपेक्षार्पूित होत नाही म्हणून नाराज होतात, नैराश्येतही जातात. तर ‘हेच पाहिजे’ आणि ‘अमुक कडूनच’ यामुळे दुस-यावर अवलंबून राहणे शिकतात. तसेच तिसरे नुकसान म्हटले तर, मुले स्वार्थी बनतात प्रत्येक वेळी मला काय मिळेल? याचाच विचार करतात. विंâवा त्यात माझा काय फायदा? असे विचारतात. परिणामी मोठे झाल्यावर भाऊ बहिणी व नातेवाईकांसोबत प्रॉपर्टीचे वाद करतात.
उपरोक्त नुकसान टाळण्यासाठी मुलांना ‘दानदाता’ व्हायला शिकविले पाहिजे. पालकत्व कसे करावे या क्षेत्रातील तज्ञ शिवांगी देसाई यांनी ‘रिसीव्हींग मोड’चे उपरोक्त नुकसान सांगितले आहे.

वास्तविक मुलांच्या प्रत्येक वाढदिवसाला किंवा सणासुदीला त्यांचे हातून मुक बधीर, अंध असे दिव्यांगांना मदतीचे, उपयोगाचे साहित्य किंवा चॉकलेट, मिठाई खाद्यपदार्थ वाटप करायला लावले पाहिजे. त्यामुळे तो किती भाग्यशाली आहे, तो दुस-यांना देवू शकतो, हा भाव निर्माण होईल. तसेच त्याग करण्याची वृत्ती वाढेल. त्यागीवृत्तीमुळे बहुतांश समस्या सुटतात याची जाणीव होईल. कारण मुले जे करतात तेच त्यांचे संस्कार बनतात, तेव्हा त्यांना देणा-याच्या पावित्र्यात प्रयत्नपूर्वक आणले पाहिजे.

एकदा एक माणूस स्वर्ग आणि नर्क यामधील फरक पाहण्यासाठी गेला, प्रथम नरकात गेला आणि तेथे पाहिले ५६ भोग खाद्यपदार्थ ठेवलेले आहेत मात्र तेथील लोक निराशेत आहेत. ते सर्व पदार्थ खावू शकत नाहीत कारण प्रत्येकाच्या हाताला सरळ काठी बांधलेली आहे, जी काढता येत नाही. आणि हात कोप-यातून वाकवून तोंडापर्यंत नेता येत नाही. हे बघितल्यानंतर ‘तो’ स्वर्गात गेला तर तेथे असेच ५६ भोग ठेवलेले आणि सर्वांचे हात तसेच काठीने सरळ बांधलेले असतांना ही सर्व लोक खात आहेत, आनंदात आहेत असे दिसले, हा चमत्कार कसा? हे पाहिले असता ते सर्व लोक आपल्या हाताने एक-दुस-याला भरवून देत होते अर्थात सर्वच खात होते. हे लक्षात आले. थोडक्यात दुस-यांबद्दल विचार केला की आपला विचार केला जातो, आणि जीवंतपणीच आपण स्वर्ग बनवू शकतो, हेच शिकायला मिळते.

तेव्हा या दिवाळीत समाजाला आपलं काही देणं लागतं, ते आपण यथाशक्ती दिले पाहिजे, फक्त पैसा, वस्तू नव्हे तर परिश्रम, सहकार्य, शारिरीक श्रम आदीचे दोन योग्य कार्यात दिले पाहिजे. प्रथमत: गरजू नातेवाईकांनाही मदत केली पाहिजे. एकूणच देण्याची सवय लागते जी आयुष्यात जगणे सुकर करते, हेच मुलांना शिकविण्याचा संकल्प करुन ही दिवाळी साजरी करु या, एवढेच.
शेवटी एक शेर आठवतो…
अहंकार को जरा हल्का तो किजीये,
एक बार किसी को दान देकर तो देखीये।

     - - - राजेश राजोरे
        9822593903
  खामगाव, जि. बुलडाणा.

Leave A Reply

Please enter your comment!
Please enter your name here