दिवंगत दिलीपकुमार यांना वाहिलेली हि आदरांजली

0
दिवंगत दिलीपकुमार यांना वाहिलेली हि आदरांजली

दिवंगत दिलीपकुमार यांना
वाहिलेली हि आदरांजली


दिवंगत, मरहुम युसुफ उर्फ दिलीपकुमार यांचे हिंदुजा मुंबई येथील रूग्णालयात आज वयाच्या ९८व्या वर्षी निधन झाले.
दिलीप कुमार एक अभिनेता म्हणुन जितके उत्तम होते तितकेच ते एक माणुस म्हणून श्रेष्ठ असे होते.

१९६१ सालची घटना आहे. नासिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील नांदुर वैद्य (लेकबिल)च्या जवळ दारणा डॅमचा एक डोह आहे या डोहावर माझ्या वडीलाच्या मामीची सावित्रीबाई रावजी पंडीत यांची दशक्रिया होती.त्या दशक्रियेला आम्ही सर्वचजण गेलो होतो. दशक्रिया सुरू असताना दिवंगत मोतीराम अहिरे हे पंडीत परिवाराचे नात जावई हे त्याच थाटात सासुरवाडीत असल्यामुळे त्या डोहात पोहण्यास उतरले.

डोहात अनेक भोवरे होते.
डोहाची खोली अनेकाना सांगता येत नव्हती.त्या भोवऱ्यात ते अडकले.गोल गोल फिरू लागले हे असे का करतात म्हणुन माझे वडील रामचंद्र तात्याबा धगाटे यांनी उडी टाकली.मोतीराम यांना वाचविण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करू लागले ते पाहुन माझे मामा रामराव भिमाजी दोडके यांनी उडी टाकली दोघेहि पोहत होते.

रामराव दोडके व माझे चुलते हे मनोहर धगाटे हे पट्टीचे पोहणारे नासिक शहरातील गोदावरीले पूर आला की नारो शंकराच्या घंट्याला पाणी लागले तरी हे त्या पुरात पोहायचे त्यांच्या जोडीला नासिक मधील प्रसिद्ध मल्ल मोहन प्यारे हे देखील असायचे परंतु घडणाऱ्या घटना कोणी टाळू शकत नाही मनोहर धगाटे हे काही महत्वाच्या बाबी नासिकहुन घेऊन येणार असल्यामुळे त्या वेळी तेथे हजर नव्हते.

दोघे जण मोतीराम अहिरे यांच्या पर्यत जात होते परंतु तो पाण्यातला भोवरा काही केल्या मोतीराम यांच्या जवळ जाऊ देत नव्हता.शेवटी मोतीराम हे भोवऱ्यात दिसेनासे झाले वडील अखेरचा श्वास घेत होते व भोवऱ्या पासुन वाचवत होते. शेवटी रामराव दोडके यांनी अर्धमेल्या अवस्थेत वडीलाना बाहेर आणले ते गेले म्हणुन रडारड सुरू झाली.

कोठुन तरी हि खबर दिलीपकुमार यांचे कानावर गेली ते स्वतः तेथे आले.त्यावेळी गंगा जमुना या चित्रपटाचे चित्रिकरण नांदुरवैद्य या गावात सुरू होते.दिलीप कुमार हे तेथे आल्यावर त्यांनी प्रसंगावधान राखत व स्वतःमधील मोठेपणा सोडुन देत त्यांची कार दिली.ड्रायव्हरला सांगुन माझे वडील व मामा यांना तातडीने नासिकच्या सिव्हिल हाॅस्पीटल मध्ये न्यायला सांगितले.त्या काळात कार वाहन हे दुर्मिळ होते ठराविक लोकाकडेच अशी साधने होती.

दोघाना डाॅक्टरानी अथ्थक प्रयत्न करून वाचविले सुरवातीला डाॅक्टरानी देखील आशा सोडली सोडली होती.परंतु शेवटी यश आले व दोघाना जिवदान मिळाले दिलिप कुमार यांच्या माणुसकीचे दर्शन त्यांच्या समयसूचकतेचे हात त्यामागे होते.

१९६१ या प्रसंगातुन वडीलाना जिवदान मिळाले होते.ते १जुलै २००६पर्यत २००६मध्ये त्यांचे वृध्दप काळाने निधन झाले १९६१ साली देवदुत म्हणुन धावुन आल्यामुळे आम्हा भांवडावर पितृछत्र अबादित राहिले.असे हे आमच्या परिवारासाठी देवदुत असणारे दिवंगत दिलिप कुमार आज हे जग सोडुन गेले.तरी त्यांच्या कर्तव्यातील जाण ठेवणारी कृतज्ञता आज व यापुढे आमच्या कुटुंबात राहील त्याच ऋणातुन आम्ही आज त्यांना कृतज्ञतापूर्वक आदरांजली अर्पण करीत आहे.

आण्णा धगाटे परिवार जेष्ठ साहित्यिक /सामाजिक कार्यकर्ता

Leave A Reply

Please enter your comment!
Please enter your name here