दादा सदा पहिलवान – लेखक: अण्णा धगाटे

0
दादा सदा पहिलवान - लेखक: अण्णा धगाटे

दादा सदा पहिलवान

दादा अन.सदा आता दुर दुर कोसो मैल गाजलेले पहिवान झाले होते.शिकायला घेतल म्हणजे शिकता येत.अन शिकल म्हणजी मोठ होता येत.हे दादा शिकला होता.बालपणा पासुनच त्याचे हात वारे त्याच्या आवळलेल्या मुठी पाहुन त्याच्या आबान त्याच नाव दादा ठेवल होत.त्याला कोणी दाद्या म्हटल की,रानबा डाफरायच कधी मधी रानबा कुस्त्याच फड.असल्यावर हलगी वाजत असताना कोणी पहिलावाना वरुन ओवाळुन टाकलेली रक्कम.गोळा करायला दादाला बरोबर न्यायचा

रक्कम.गोळा होई पर्यत त्याला भान राहत नव्हत.पर घरी आल्यावर मातर तो ध्यानावर येत होता.अर म्या अशी हलगी वाजवुन जगतो.अन पोराला पर ववाळून टाकलेले पैसे गोळा करायला लावतो.थु असल्या जिण्यावर,नग हे जिण म्हणत,तो स्वतःवरच चिडत होता.

जस.जसा तो स्वतःवर चिडायचा तस तस..त्याच मन जाग व्हायच आता तो म्हणायच दादा.आता.तु येत जाऊ नग.पर दादा आता या.कुस्त्या.फडातुन बरच काही शिकला होता.अर आपण सिंदीच्या फडा पासन केरसुण्या बनवतो.लोक भले तिला लक्ष्मी म्हणतात पर आमच्या हातात कवड्या रेवड्या देतात.आपण लक्ष्मी देतो.अन.अवदसा पदरात बांधुन घेतो.तमाशाच्या फडात लोक काम करतात. खर तर ते कलावंत लोकाना त्यांच्या मनातल ओळखुन.जनतेचच सुखदुःख त्यांच्या पुढ.मांडुन हसवायच रडवायच काम करतात पर लोक.शेवटी तमासगीर म्हणुन हिणवतात.

पर आपण.कुस्तीगीर व्हायच.ते पर कुस्त्याच्या फडात.फडातल्या कलावंताची अवहेना पर फडातल्या पहिवानाला खांद्यावर घेतात.मान सन्मान असतो.दादा आता पहिलवानाकडे कुस्त्या कशा करायच्या किती जोर दंड.बैठका मारायच्या,खुराक काय घ्यायचा त्यांनी सांगितलेला खुराक ऐकुन दादा इचार करायच अर चार दोन अंडी इकुन तेल मीठ.मिरची सौदा आपण आणतो कधी मधी खातो अंडी,पर रोजच कुठ हो खाता येणार? दुध एका म्हसराच ते आख्या घरादाराला लागत.

आबाला तर दुधात भाकरी चुरून खाल्या बिगर भागत नाय मग आबाच्या तोंडच दुध आपण काढुन घ्यायच व्हय,अर आपण रानचा वारा पिऊन,एवढे दणकट झालो. दगडावानी राकट पर पहिलवान.म्हणत्यात तर घेत जाऊ खुराक.आता मातर जोड. कोणी तरी.घेतला पाहीजे.सदा घेऊ जोडीला तो पर पिळदार बांध्याचा उचा पुरा हाय,

ठरल निम्या राती निघायच रातच्याला खुराड्यात शिरून. काही.अंडी असली तर उचलायची नाय तर लुसलुशीत कोंबड तर कुठ गेल नाय,
पहिल्यादा तरी एक बस.कोण्या गोरगरीबाची अती करून माती करायची नाय.म्हणत,ओल्या कपड्यात गुंडाळून कोंबड आणुन घोड्यावरल्या पडशीत ठेवत होते.

कोंबड जगल तर जगल गुदमरून मेल तरी चार पास तासान खायचच हाय, मग एखाद्या गोठ्यात शिरायच चांगल कळशीभर दुध घ्यायच.कोणी पाह्यल तरी समोर यायची त्याची
बिशाद नव्हती.भु भु करीत समोर बेसुद पडायचा.दादा सदान तस खेतरच केल होत.त्यांच्या जवळ एक काळा घोडा होता.काळ कफनीवानी कापड शिवुन घेतले होत.

चांगल्या भल्या मोठ्या बोकडाची शिंग सफेद रंगवुन घेतली ती तोंडाजवळ तोंडातुन दाताचे सुळे बाहेर आल्यागत काढायचे तोडाला तव्याच काळीक फासलेली.डोंक्यावर बैलाची शिंग अस भुतावानी अवसान एकजण करायचा अन गप्प गुमान घोड्यावर बसुन राहायचा. हलायच नाय डुलायच नाय माणसाच सावट दिसल की, घोड्याचा लगाम ओढायचा घोड उच दोन.पायावर उभ राहुन खैकाळत होत.पर वरला माणुस हालत नव्हता का डुलत नव्हता.

तर दुसरा खुराड्यातली दिल्याली अंडी.अन कोंबड.घेऊन नदीवर यायचे तवर शुकिर निघालेले असायच मग चांगले शे पाचशे जोर दंड बैठका मारायचे.वीस. पंचविस.मिनट पोहायच.अंग पुसायच मग एकान अर्धी कळशी अन दुसर्‍यान त्यात उरल्याली अर्धी कळशी घडाघडा आवाज करीत खाली करायची.
कळशी चागंली पाच शेराची होती एकेकाच्या हिश्याला चांगल अडीच शेर दुध यायच
दुधाला नरड्या खाली उतार लागलेला असायचा मोटच्या सोंडन थळात बदाबदा पाणी वताव तस.दुध.पोटात वतले जायच.

तवर कोंबड चांगल निखा ऱ्या
वर तावूनसुलाखुन निघाच मग काय शिवावरल्या म्हसोबाला तेल अन शेंदुर एकजिव करून चोळावा तसा त्या कोंबड्याला घरन आणल्याल तेल मिठ मिरची चोळली जायची.तवा कुठ कोंबड त्याच्या पोटाच्या खोबडात देव्हाऱ्यात म्हसोबान जाऊन बसाव.तस बसायच मग हे दघ म्हसोबाचा जयजयकार करायचे

अन.म्हणायचे बघ देवा तुला जस आम्ही करतो.तसच तुझ्या लेकराला त्या कोबड्याला पर करतो.तवा हि आमची भोळी भाबडी सेवा मानुन घे.दादा,सदा
अधीच रगाट मांगच्या घरात जन्माला आलेले.चोऱ्या दरोडे म्हणु नका,उच्च सिंदीची फड साळायची म्हणु नका?सुळ्यावानी विषारी काट असणार केकताड साळायच म्हणु नका.दिसनिम्मी रात म्हणु नका.पाण्याच्या डव्हातल केकताड सडकुन काढायच.

अशा खानदानात जलम घेतलेली हि दोघ.त्यात रानवारा पिवुन चपळ खोडावानी पळत सुटणारी अन आता तर अडीस शेर दुध अन अर्ध कोंबड प्रत्येकाच्या वाट्याला येत होत.मग काय आधीच रगाट त्यात नंगाट झाली होती.तवा यांना पाहिल का,नग आपल्या माग याच झेंगाट अस समोरचा म्हणत होता.

गावातल्या वळु म्होर जशी कोणाची यायची हिम्मत होत नाय तशी त्यांच्या म्होर यायची कोणाची हिम्मत होत नव्हती. आता दादा,सदा एक नंबर पहिलवान झाले होते.त्यांनी इचार केला.

अर आपण एवढ शरिर कमावल पर आपली जात मांग कोण आपल्याला फडात खेळू देणार? अन खेळु दिलच तर आपल्या पुढ हार झाल्याच कोण कबुल करतील का?हार झाली तर वैराचा डाव साधतील मग करायच काय? एवढ मांद अंगावर असुन भी बडवलेल्या बैलावानी आपली गत होणार तस, होऊ द्यायची नाय,तर लांब.मुलखात जायच.शोधा म्हणजे सापडेल गरज हि शोधाची जननी आहे हे त्यांना आता ठावुक झाले होते.

प्रवासाला निघाले की,गंत्यव्य स्थान आपोआप सापडते तसेच दादा अन सदाचे झाले.बस आज रातच्याला जायच ठरल.अंधारान गावाला कुशीत घेतल होत.त्याच कुशीत गाव शांत झोपला होता. घोड्याना सुध्दा माहित होत.कधी दुडक्या चालीने तर कधी भरधाव वेगान पळायच हे दादा सदाच्या घोड्यानां माहीत होत.सामसुम गावात ते मांजराच्या चालीने चालत होते.

घोडे भिवा पाटलाच्या वाड्यापुढ उभी राहली.भिवा पाटील डारडुर घोरत पडला होता.जणु जीवाला काही घोर नाही.दादा सदान त्याला उठवल.या दोघाना समोर पाहुन भिवा पाटलाची भंबेरी उडाली.या दोघानी खुणेन सांगितल की.गपगुमान बसायच. आम्ही सांगतो ते ऐकायच जर आमच ऐकाच नसल तर मग.यमाच ऐकायच,

सदा बुचकाळ्यात पडला.तो दादाला इचारू लागला अर यमा भी आला व्हय,आपल्या बराबर,तसा दादा हसला अर सदा आपला यमाच नव्ह र माणुस जवा आपल्या करणीन वागतो.तव्हा त्याला थेट वर नेतो.तो यमा तसा सदा पर हसला.तो व्हय,अर तो तर आपल एका मिनटात ऐकणार.बोला पाटील,तसा त,त फ,फ करीत तो म्हणाला,बोला तुमचच ऐकतो,

तरी पर यांना भिवावर भरवसा नव्हता.हा कधी गाव जागा करील याच्या भरवश्यावर राहता कामा नये म्हणुन त्याच्या मुसक्या बांधल्या.तुमचा भाऊ मिलीटरीत गेला होता का? तसा भिवा म्हणाला,व्हय,व्हय त्याच लगीन झाल होत का,नाय,नाय ते जिते हाय का?शहीद झाले,तसा भिवा डोळ्यात आसव आणुन सांगत होता.शहिद झाले.आता भिवा तुम्ही लायनीवर आला.आता पायंटाचा मुद्दा बोलु तवा आता आम्ही सांगतो ते ऐकायच,

अन गप गुमान नंदीवानी मान डोलवायची,आम्ही गुबुगुबु केल की,मानमोडी झाल्यावानी मान हालवायची शिंग हालवायची नाय नाय तर ये रे बैला घाल शिंग अशी हालत होऊन जाईल आम्ही तुझ्या भावाची लेकर आहे.भाऊ तिकड गेला.मिलीटरीत भरती झाला. तिथच त्यान लगीन केल त्याची हि पोर रातच्या आली.त्याचा आनंद झाला म्हणत घोड्यावर बसवुन गावभर आमची टोलेजंग मिरवणुक काढायची

सकाळी सकाळी गावोगावी सांगावा पाठवायचा.सांजच्याला मिरवणुकीचा बार उडवुन द्यायचा घोडे आमच्या जवळ हाय त्याची काळजी करू नग,सांजच्या आमची मिरवणुक नाही तर तुझ्या मयतीची यात्रा दोन्हीतल काय ते बोल ? भिवा सांगु लागला.तुम्ही म्हणाल तस करतो.शिकार अवसात आल्यावर हे म्हणाले करतो काय,तुझ्या बा,ला पर कराव लागल.

फौजी भावाची जमीन सारी आयती मिळाली.ती करुन खातो.बोल आता आम्ही कोण? तसा भिवा सांगु लागला शहीद झालेल्या फौजी थोरल्या भावाची लेकर तसे हे दोघे म्हणाले,एका शिकवणीतच तु बराबर शिकला. भिवा नाना आता बापा परीस तु लहान म्हणुन तुला नाना म्हणायच पर आम्ही काय बोललो तर मातर ना,ना म्हणायच नाय,

आम्ही आता चांगल वरीस.सहा महिन.इथच राहणार ते पर आमच्या मर्जीन तवा तु आमची मर्जी संभाळायची नाय तर तुला यमाची मर्जी संभाळावी लागल. भिवान कबुलीनामा देऊन सारी जबाबदारी.घेतली.आता.भिवा नाना जिथ हगामा तिथ आम्ही जिथ कुस्त्याचा फड तिथ आमची पकड तु आम्हा घेऊन जायच सांगायच हि माझ्या फौजी भावाची लेकर दादा अन सदा पुर नाव सांगायच नाय,त्यांनी इचारल तर सांगायच मला त्याच नाव घेताना उर भरून येतो तवा मी नाव सांगु शकत नाय.

आखाड्यात फकत दादा अन सदा एवढीच नाव पुढ आली पाहीजे.झाल भिवा नाना दादा सदाला घेऊन गावोगावच्या आखाड्यात उतरवु लागला. दंड थोपटले की, कुस्ती चितपट झालीच समजा कोणाचाच टिकाव दादा सदा पुढ लागेना. बक्षीसच बक्षीस मिळु लागली.ते पाहुन भिवा नाना लाळ गाळू लागला.तवा या दोघानी ठणकावुन सांगितले.

भिवा नाना आम्ही जे काय मिळवु त्यातले फकत दोन आणे हिस्सा तुम्हाला आम्ही देणार,आम्हाला त्या बदल्यात रोजची दहा दहा अंडी तीन तीन शेर दुध एकेकाला काजु बदामाचा शिरा झालच तर गुळ खोबऱ्याचे लाडु रातच्या पाच पाच भाकरी दोघात एक कोंबड बस होईल एवढ करायच

तु म्हणशील एवढ्यात भागायच नाय तर तु फौजीची जमीन वर्षानु वर्ष करून खातो तव्हा आम्हाला हिशोब सांगु नको.नाय तर चित्रगुप्ताला तुझा हिशोब करायला सांगु.बीन वाजली की, नागावानी डुलायच,फणा वर काढला की आमचे दंड अन आखाड्यातली धोबी पछाड तु पाहिलीच आहे.नागाच पर इख पचवणारी हि मांगाची जात हाय.

ठरल्या प्रमाणे घडत होत.एखाद्या जीन परमान बोल मेरे आका म्हणत,भिवानाना हजर असायचा दादा सदा आता आखाड्यात उतरले की,कोणी आखाड्यात उतरत नसायचे मग हे दोघ आपले शरीरसौष्ठव दाखवुन इनाम घेऊन नाम कमावत होते. याच्या नावा बरोबर भिवा नानाच पर नाव होत असायच

पर म्हणतात ना जात नाही ती जात एका आखाड्यात एक जण.पंचाला म्हणाला,हे मला फौजीचे मुल वाटत नाही.हि तर आमच्या गावाची मांगाची पोर दिसतात.तस दादा सदा दिसतात तसा दादा सांगु लागला.व्हय व्हय असु शकतात.पर आम्ही ती नाय अहो,एका माणसासारखी दिसणारी माणस असतात.की,बर वाटल ऐकुन तुमच्या गावचे पहिलवान पर आमच्या सारखे आहेत.तुम्ही तर म्हणता आम्हीच ती.आम्हाला पर बर वाटल

चला तर आमच्या गावाला भिवा नानाच्या घरी ऐकत बसु रातभर
आजच्या दिवशी आपण बरोबर राहु एकत्र राहु ऐकु तुमच्या गावच्या पहिलवानाच्या कथा. जमल तर देऊ त्यांच्याशी लढत

जाती पाती उकरून काढणार्‍या त्या कळलाव्या नारदाला पर पटल एवढ्या मोठ्या पहिलवाना बरोबर राहायला मिळत हे भाग्यच जाऊ एकदाचे यांचे घरी हलाल करणाऱ्या बकऱ्याला चांगल खाऊ घालतात.तस त्या कळलाव्याला खाऊ घातल. दुसर्‍या दिवशी त्या सोडायला शिवे पर्यत गेले व याच तोंडाने बोलला होता का? म्हणत एक ठोश्यात दोन दात पडले तोंड वाकड झाल.तर हात वारे करीत बोलत होता तोच डावखुरा डाव्या बाजुचा हात खांद्या पासुन केला निखळला तो विव्हळत गावाकडे गेला.

त्याला हाग्या दम दिला पर कोणत्या गावातच काय आपल्या गावात पर विषय काढला तर जिवंत ठेवणार नाही हे लक्षात ठेव.त्यान चांगल लक्षात ठेवल. त्यान.कुठ हि काही बोलला नाही
असे अनेक दिवस गेले.भिवाच पर तोंड बंद झाल होत पर दादा सदाचा खुराक चालु होता.फड गाजत होते.

दादा सदाच मन त्यांना खात होत अर आज आपल्या पुढ यायला कोणी धजावत नाही.आपला नावलौकीक झाला.पर आपण ज्या मातीत जन्माला आलो ज्या जातीत जन्माला आलो.त्याच काय त्याच्याशी नाळ तुटली. माणुस स्वतःसाठी जगतो तेव्हा तो स्वार्थी असतो.माणुस म्हणुन जगत नसतो.माणसानी माणसासाठी जगण यालाच तर माणुसपण म्हणतात त्यात तर आपण हरलो.

चला आता गावाकड.म्हणत हे दोघ निघाले ते निघताना भिवा नानाच्या डोळ्यात पाणी आल दादा सदा भिवा नानाचा घरी आले होते तेव्हा त्यांनी भिवा नानाच्या डोळ्यात क्रुरतेन पाणी आणल होत.पण आज त्यांच्या ममत्वान पाणी आणल होत.ते जीव घेण्या प्रसंगान पण आजचे डोळे हे जीव लावण्याने ओले झाले होते.हिच माणसाची दोन रूप असतात.

याच रूपान दादा सदा बरेच काही शिकले होते.भिवा नानाच्या डोळ्यातले पाणी पाहुन दोघाची. मन.हेलावले त्यांनी विचार केला अरे काही काळ आम्ही एकत्र राहिलो तर या पाषण.ह्रदयी माणसाच्या ह्रदयाला पाझर फुटला.मग ज्या गावात ज्या वस्तीत मोठे झालो त्यांच्या भावनाचे काय? याचा आपण विचार केला पाहीजे जात हि एक अशी ती जात नाही पण ती घालविण्यासाठी जात चोरून पळत राहण हा त्यावर उपाय नाय

कोंबड.झाकुन ठेवल म्हणजे पहाट व्हायची थोडीच राहते. मग आपण पहाटेतच उजळ माथ्याने का राहु नये. म्हणत ते गावाकडे आले.जातीला भेटले गावगाड्याला भेटले व गावकऱ्यांना सांगु लागले.आम्ही आमच नाव मोठ केल आमच्या नावा बरोबर गावाच मोठ करू पाहतो.

गावकर्‍यांनी आता जात पात विसरून एक व्हाव.आपण गावाच नाव मोठ करू.गावाच नाव मोठ करून घरटी पहिलवान तयार करू व पहिलवानाच गाव हेच आता पुढ आणु. दादा सदा. पहिलवानाच गाव हि ओळख पंचक्रोशीत गावाची करू.

ठरल तर गाव तयार हे करायला झाल.गावातली घर काळ्या मातीत राबत होती.तर घरटी एक जण तांबड्या मातीत कसरत करीत होता.आता दादा सदा पहिलवानाच्या आडगावाची किर्ती ऐकुन भिवा नानाच पर मन जाग झाल.

घरदार जमिन जुमला विकुन भिवा नाना मांगवाड्यात राहायला आला होता.तो त्याची जात विसरून गेला होता.जाती परिस त्यान माणस जाणली होती. गरीबीशी पर झगडुन माणस मोठी होतात.परिस्थिती बदलता आली नाही तरी मानसिकता बदलुन बरच काही शिकतात. माणसाला जीव लावतात.त्यांनी जो लावला त्या माया ममते पुढे हि धन दौलत हा जातीचा पोकळ अहंमभाव काय घेऊन बसला. त्यांच्यामुळे मला जातीच्या पलिकडे जाऊन ओळख मिळाली.

तीच आता माझी ओळख जातीपातीला मुठ माती देऊन आता काळ्या मातीत राबायच अन तांबड्या मातीच नाव मोठ करायच वय झाल तरी भिवा नाना तालमीत जाऊन कसरत करू लागला.जातीच्या कोंडाळ्यात भाऊबंदकीच्या कोंडाळ्यात राहुन हे कोड्याळे तोडुन आता मोकळेपणान जगायच माणसाची जात सांगत.कोणी विचार तर अभिमानान सांगायच दादा सदा पाहिलवानाच्या आडगावचा मी भिवा नाना पहिलवान दंड थोपडुन लढणार जात घालवुन कला जिवंत ठेवण्यासाठी दादा सदा पहालवान की जय ..

लेखक: अण्णा धगाटे

Leave A Reply

Please enter your comment!
Please enter your name here