तुझं येणं ….

0
तुझं येणं ….

तुझं येणं ….

तुझं गोड पावलांनी येणं म्हणजे
दुःखाच्या डोंगरांचं कोसळणं असतं.
वेदनांच्या कोंडमाऱ्याचं विरघळणं असत.
अलगदपणे व्यथांचं मिटून जाणं असतं
इतकं तुझं येणं सदोदित पावण करणारं असतं.

तुझं येणं….

तुझं येणं म्हणजे..
उदासीनतेच्या बेरंगात रंग भरणं असतं.
मानगुटीवरचं ओझं खाली होणं असतं
शुष्क,रुक्ष भावनांचं चिंब होणं असतं
अमृतत्वाच्या वर्षावानं अभिषेक करणं असतं.

तुझं येणं…

तुझं येणं म्हणजे…
भिरभिरत्या फुलपाखरांचं बागडणं असतं
लक्ख दिव्यांचं आसमंतात प्रकाशनं असतं
लक्ष लक्ष तारकापुंजाचं चमकणं असतं
तुझ्या दरवळत्या सुगंधात माझं महकणं असत.

तुझं येणं…..

तुझं येणं म्हणजे…
तुझं येणं किंवा जाणं असं काहीच नसतं
तू आहे तिथंच आहे किंवा आहे इथंच आहे
फक्त बंद डोळे उघडण्याचा अवकाश
तू साक्षात आहेस.

तुझं येणं

तुझं येणं म्हणजे…
तुझ्या उपस्थितीतच सगळं भरून पावणं आहे
तुझ्या अस्तित्वातच माझं अस्तित्व
विलीन करणं आहे
अथांग प्रेमाच्या पराकाष्ठेत
स्वतः संपणं आहे.

तुझं येणं…

तुझं येणं म्हणजे…

@कवी सुभाष पवार,पिंपळगाव बसवंत
[email protected]
9767045327

Leave A Reply

Please enter your comment!
Please enter your name here