HomeUncategorizedतंत्रज्ञानाच्या आधुनिकतेच्या युगामध्ये उद्योजक व्हा: राजेंद्र कोंढरे

तंत्रज्ञानाच्या आधुनिकतेच्या युगामध्ये उद्योजक व्हा: राजेंद्र कोंढरे

अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने व्यवसाय मार्गदर्शन मेळावा संपन्न

Bhavnagari प्रतिनिधी
बारामती :
नोकरीच्या पाठीमागे न लागता स्वतःचा व्यवसाय सुरू करा, त्यासाठी महामंडळ च्या माध्यमातून अल्प व्याजदरात कर्ज घेऊन सावधपणे, डोळसपणे,बाजारपेठ चा अंदाज घेत,तेजी मंदी चा अभ्यास करीत उत्तम व्यवसाय करा व उद्योजक व्हा असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांनी केले.
अखिल भारतीय मराठा महासंघ व बारामती तालुका मराठा सेवा संघ यांच्या वतीने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ मार्फत व्यवसायासाठी कर्ज योजनांची माहिती, सारथी योजना व व्यवसाय मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी राजेंद्र कोंढरे बोलत होते.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष पांडुरंग जगताप,शहराध्यक्ष गुलाब दादा गायकवाड,जिल्हा सरचिटणीस विक्रम पवार, बारामती बँकेचे चेअरमन सचिन सातव, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष नामदेव तुपे पंकज सावंत व संभाजी होळकर, दत्तात्रय आवाळे व विविध बँकांचे अधिकारी, जिल्हा उद्योग केंद्र, व सारथी योजनेचे प्रतिनिधी उपस्तित होते.
स्वयंरोजगार वाढवण्यासाठी शासनाचा उपक्रम आहे यांचा लाभ घ्या आर्थिक साक्षरता व वैयक्तिक प्रगतीसाठी लाभार्थी व्हा तसेच येणाऱ्या काळात तालुका व जिल्हास्तरीय मेळावे घेऊन नव उद्योजकांना सहकार्य करणार असल्याचे राजेंद्र कोंढरे यांनी सांगितले.
तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी महामंडळाच्या माध्यमातून उद्योजक होण्यासाठी विविध बँक सहकार्य करणार असल्याचे प्रास्ताविक मध्ये अखिल भारतीय मराठा महासंघाचे बारामती तालुका अध्यक्ष संभाजी माने यांनी सांगितले.
बारामती सहकारी बँकेच्या माध्यमातून युवकांना उद्योजक घडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे बारामती बँकेचे चेअरमन सचिन सातव यांनी सांगितले.
या या मेळाव्यामध्ये विविध बँकांचे प्रतिनिधी जिल्हा उद्योग केंद्रांचे प्रतिनिधी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
पुढचे पाऊल या पुस्तकाचे प्रकाशन सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले बारामती सह इंदापूर दौंड पुरंदर फलटण आदी तालुक्यातून मोठ्या प्रमाणात युवक वुवती उपस्तित होते. आभार ऍड सुप्रिया बर्गे यांनी मानले.

बारामती सहकारी बँकेच्या वतीने मेळाव्यामध्ये पाच प्रकरणे तात्काळ मंजूर करण्यात आली व व्यवसाय करू इच्छुक तरुणांनी लवकरात लवकर कागदपत्रे जमा करावीत असे आव्हान बारामती सहकारी बँकेचे चेअरमन सचिव सातव यांनी केले.

Bhavnagari
Bhavnagarihttp://bhavnagari.in
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

मदन ( बापू) कोल्हे जेष्ठ पत्रकार संपादक धर्मभूमी परभणी on