डॉ. श्रीमंत कोकाटे यांनाच पदवीधरांचे ‘आमदार’ करा – उमेश चव्हाण

0
डॉ. श्रीमंत कोकाटे यांनाच पदवीधरांचे 'आमदार' करा - उमेश चव्हाण

डॉ. श्रीमंत कोकाटे यांनाच पदवीधरांचे ‘आमदार’ करा – उमेश चव्हाण

पुणे – गेली अनेक वर्षे पुणे विभाग पदवीधर मतदार संघात भाजपाचा आमदार ‘प्रभावहीन’ ठरला आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीचा उमेदवार ‘थकलेला’ आहे. सरंजामी परंपरेने लढवण्याची ही निवडणूक नाही. आणि इथला मतदार सामान्य माणूस नसून पदवीधर आहे, त्यामुळे डॉ. श्रीमंत कोकाटे यांच्यासमोर ताकदवान उमेदवार उभे आहेत. आव्हान मोठे असले तरी सर्वांनी जीवाची बाजी लावून डॉ. कोकाटे यांनाच पदवीधर आमदार करा, असे आवाहन रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी केले.

पुणे विभाग पदवीधर मतदार संघाचे उमेदवार प्रसिध्द साहित्यिक डॉ. श्रीमंत कोकाटे यांना रुग्ण हक्क परिषदेने विनाअट पाठिंबा दिला. पाठिंब्याचे पत्र परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी प्रदेश सचिव अर्चना प्रधान, परिषदेच्या नियोजन समिती सदस्य नम्रता पवार, पुणे शहर उपाध्यक्ष अपर्णाताई साठ्ये, पुणे जिल्हा प्रभारी गिरीश घाग,कार्यालयीन सचिव दीपक पवार उपस्थित होते.
विविध विद्यापीठातुन तेरा पदव्या प्राप्त, शिवचरित्राचे अभ्यासक, प्रसिद्ध व्याख्याते, इतिहास संशोधक म्हणून त्यांनी केलेले काम प्रचंड मोठे आहे. पदवीधर आमदार म्हणून ते पदाला उत्तम न्याय देतील, अशी खात्री असल्याने त्यांना पाठिंबा दिला. त्यांना निवडून आणण्यासाठी रुग्ण हक्क परिषदेचे कार्यकर्ते जीवाचे रान करतील, असे उमेश चव्हाण म्हणाले.

Leave A Reply

Please enter your comment!
Please enter your name here