डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम हेल्थ क्लबचा उद्घाटन शुभारंभ

0
डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम हेल्थ क्लबचा उद्घाटन शुभारंभ

डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम हेल्थ क्लबचा उद्घाटन शुभारंभ नगरसेविका मयुरी शिंदे यांच्या माध्यमातून विकासकामात भर

स्थानिक नगरसेविका मयुरी सूरज शिंदे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे खेळाडू आणि आमराई भागातील युवकांना व्यायामशाळा उपलब्ध.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम हेल्थ क्लबचा उद्घाटन शुभारंभ

बारामती नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा पौर्णिमाताई तावरे यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम हेल्थ क्लबचे उद्घाटन करण्यात आले. या व्यायाम शाळेमुळे खेळाडू आणि आसपासच्या युवकांना या व्यायाम शाळेचा फायदा होणार आहे.आजच्या धावपळीच्या जीवनात हेल्थ सांभाळणे खूप महत्त्वाचे आहे खाजगी जिमच्या फी भरमसाठ आहेत त्या फी सर्वसामान्य लोकांना परवडणाऱ्या नाहीत परिणामी इच्छा असतानाही हेल्थ कडे दुर्लक्ष करावे लागते.त्यामुळे या व्यायाम शाळेचा युवकांना नक्कीच फायदा होणार आहे प्रभाग क्र.१७ मधील ही दुसरी व्यायामशाळा आहे त्यामुळे येथील युवकांना मोठ्या प्रमाणात व्यायामाची सोय झाली आहे.

याप्रसंगी शहराध्यक्ष इम्तियाजभाई शिकीलकर,नगरसेवक बिरजू मांढरे, नगरसेविका रूपालीताई गायकवाड,अनिताताई जगताप,मा.नगरसेवक रमेश मोरे,सुरज शिंदे,पत्रकार तैनूरभाई शेख,पंकज सस्ते,रा.काॅ.संघटक शक्ती भंडारे, सुमित सोनवणे, अमर भंडारे, प्रशांत भालेराव, अमोल भोसले,संदिप मोरे, महेंद्र मोरे,निवास सोनवणे, कमलाकर सोनवणे,श्रीकांत पाथरकर, मंगेश साबळे, सचिन हजारे, पप्पू साबळे, रंजीत पवार,सुरज झोडगे इ. मान्यवर उपस्थित होते.उपस्थितांचे स्वागत स्थानिक नगरसेविका मयुरी शिंदे यांनी पुष्पगुच्छ देऊन केले.

Leave A Reply

Please enter your comment!
Please enter your name here