जीवनातील विभिन्न क्षेत्रांना आपल्या प्रभुत्वशैलीने नवी ओळख प्राप्त करुन देणारे एक समृद्ध व्यक्तिमत्व: डॉ. स्मिता मालपुरे ©लेखक सुभाष पवार
सप्तश्रृंगीच्या पायथ्याशी, निसर्गाच्या कुशीत वसलेल्या कळवण हे गाव जन्मस्थान असलेल्या consultant radiologist डॉ. स्मिता मालपुरे ह्या वैद्यकीय, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक, शास्त्रीय संगीत,कला,शिल्प,पर्यावरण,वक्तृत्व,निवेदन यासह विभिन्न क्षेत्रात कार्यरत आहेत व त्या त्या क्षेत्राला स्वतःच्या प्रभुत्वशैलीने नवी ओळख प्राप्त करून दिली असे गौरवपूर्वक म्हणावेसे वाटते.डॉ. स्मिता यांचा हा प्रवास रंजक तर आहेच पण तितकाच हृदयस्पर्शी, सप्तसुरांची सुगंधी फुले उधळणारा, व प्रचंड चालना देणारा आहे असे एकंदरीत त्यांच्या वाटचालीवरून लक्षात येते.ज्या ज्या क्षेत्रात त्यांचा वावर राहिला आहे त्या त्या क्षेत्राला एक प्रकारे नवसंजीवनी देऊन झळाळी देण्याचे महत्कार्य त्यांच्या हातून घडत आले आहे.
बालपणापासूनच वक्तृत्व कलेत पारंगत:अनेक पारितोषिके प्राप्त

डॉ.स्मिता यांचे प्राथमिक शिक्षण कळवण येथे झाले.इयत्ता चौथीत असतानाच शिवजयंतीला भाषण करण्यासाठी कोणी पुढे येत नव्हते,त्यावेळी डॉ. स्मिता मालपुरे यांनी छ.शिवाजी महाराजांचा इतिहास अर्धा तास सारांश रुपात भाषणातून सांगितला व हीच उमेद पुढे सातत्याने ठेवत प्राथमिक स्तरापासून ते महाविद्यायीन स्तरापर्यंत अनेक वक्तृत्व स्पर्धांत भाग घेऊन आपल्या अमोघ निवेदन शैलीच्या जोरावर कित्येक पारितोषिके पटकावली.इयत्ता चौथीत पूर्व प्रा.शिष्यवृत्ती परीक्षेत कळवण केंद्रात प्रथम येऊन त्यांच्या बुद्धिमत्तेची चुणूक तिथेच दिसून आली होती.
कुटुंबातून प्रगल्भ झाल्या सामाजिक जाणिवा

डॉ.स्मिता ह्या वडिलांना त्यांचे प्रेरणास्रोत मानतात. वडील डॉ.जी. व्ही.मालपुरे हे बागलाण पंचक्रोशीत एक आदर्श डॉक्टर, राजकारणी आणि कुटुंबवत्सल व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात.वक्तृत्वाचे व साहित्याचे बाळकडू स्मिता त्यांना वडीलांकडूनच मिळाले. एकत्र कुटुंबात वाढल्याने सामाजिक जाणिवा जपण्याची सवय लागली.येणाऱ्या प्रत्येक समस्येत मार्ग व संधी शोधायची सवय घरातूनच लागली.संकटे देऊ नको, असे मी म्हणणार नाही पण लढायची शक्ती दे ही रवींद्रनाथ टोगोरांची प्रार्थना घरी दररोज संध्याकाळी म्हटली जायची. ह्या प्रार्थनेने डॉ.स्मिता यांच्यात नेहमीच मानसिक व आत्मिक बळ येत गेले आहे.
आई सौ. विजया मालपुरे ह्यांचा समर्थांवरचा विश्वास आणि श्रद्धा यामुळे अध्यात्मिक गोडी वृद्धिंगत होत गेली. वडिलांनी जाणीवपूर्वक दिलेल्या साहित्याच्या संस्कारातूनच वपुर्झा सारख्या कार्यक्रमांचे व त्यापुढील अनेक कार्यक्रमांचे आयोजन त्या यशस्वीपणे करू शकल्या.असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांचे पती डॉ अमोल वाकेकर भुलतज्ञ असून हार्दिक व रुधिरा ही दोन अपत्ये आहेत
नवोदय मधील बेस्ट आऊटगोईंग स्टुडन्ट

इयत्ता पाचवी नंतर नवोदय विदयालय परीक्षेतून खेडगाव येथील जवाहर नवोदय विद्यालयासाठी त्यांची निवड झाली.नवोदयमध्ये डॉ. स्मिता मालपुरे ह्या स्कॉलर असण्याबरोबरच जिल्हा व राज्यस्तरीय सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग,गायन,नृत्य,लेखन,काव्य,एकांकिका ह्या सर्व अँक्टिव्हिटीत हिरीरीने सहभाग घेऊन अनेक बक्षिसे पटकावली.त्यांची निबंधाची वही आठवी ते 12 वी पर्यंत सर्व वर्गात दाखवली जायची.त्यांच्या बॅचच्या बेस्ट आऊटगोईंग स्टुडन्ट म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो.
सामुदायिक गीते(community song)बनलीत जीवनाला आकार देणारी सुत्रे

जवाहर नवोदय विद्यालय येथे सी बी एस ई बोर्डाचा दर्जेदार शिक्षणक्रमाबरोबरच
सांस्कृतिक उपक्रम, कला,क्रीडा,संगणक ,एस. यु.पी.डब्ल्यू यासह विभिन्न प्रकारात विद्यार्थ्यांना नवोदय मध्ये शिक्षण मिळत होते.
नवोदय मधील अनेक कमिटी साँग्स मध्ये त्या नेहमीचअग्रभागी होत्या.हम होंगे कामयब, जात कोणती पुसू नका,इतनी शक्ती हमे देना दाता, हम ही नवोदय हो,ह्या गाण्यांनीच माझ्या जीवनाला आकार दिला असून जीवनाच्या कोणत्याही कठीण परिस्थितीत उभे राहण्याचे बळ ह्या गाण्यांमधून आजही मिळत आहे.असे डॉ स्मिता सांगतात. ही गाणी तल्लीन होऊन गायली जात असत.ह्या गाण्यांनी मुलांचे भावविश्व समृद्ध बनत जात होते.व हीच समृद्धता डॉ . स्मिता ह्या आजही जोपासत आहेत .खरे तर डॉ स्मिता व इतर काही मुलींमुळे ही गाणी कायम सहाध्यायीच्या लक्षात आहेत.डॉ. स्मिता म्हणतात की एक एक प्रार्थना म्हणजे एक एक सुविचारच आहे.ह्या प्रार्थना अशा आहेत की ज्यामुळे इतर potential ची गरजच भासत नाही.हे शारदे मा, ऐ मालिक तेरे बंदे हम,सर्वात्मका शिवसुंदरा ह्या प्रार्थना नवोदयमध्ये भावविभोर होऊन ऐकल्या जायच्या,म्हटल्या जायच्या.
वाईट वेळ ही स्वतःला भक्कम करण्यासाठी येते

डॉ. स्मिता म्हणतात,
Tough time dosen’t last long but tough people do
वाईट वेळ जेव्हा येते,तेव्हा ती फार काळ आपले अस्तित्व टिकवून ठेवत नाही.आई वडिलांच्या शिकवणुकीचा समर्थ वारसा व नवोदयमधील कमिटी सॉंग ह्यामुळे कोणत्याही विपरीत परिस्थितीसमोर गर्भगळीत होण्याची वेळ आली नाही
महाविद्यालयीन कार्यकाळातील उज्वल कारकीर्द

जयहिंद ज्युनिअर कॉलेज मध्ये शिक्षकांनी मुलांसाठी केलेल्या कार्यक्रमाच्या त्या पहिल्या विद्यार्थी अध्यक्षा होत्या.12 वी नंतर आता’चला परीक्षा संपल्या,आता फक्त टी व्ही पाहणे,मौजमजा करणे’एवढा विचार त्यांनी करून ठेवलेला असतानाच,वडिलांनी टी व्ही बंद करून प्लेझर बॉक्स हे व.पु.काळेंचे पुस्तक व लायब्ररी चे कार्ड त्यांच्या हाती सोपवले.यातून त्या व. पू.काळेंना वाचतच गेल्या व साहित्यिक जाणीवा समृद्ध होत गेल्या.जीवनाबद्दलच्या समग्र आकलनास हे पुस्तक देखील तितकेच सहाय्यक ठरले.कारण वपुंच्या वाचकांबद्दलचा आत्मीय संवाद व आनंदाचा ठेवा ह्या पुस्तकात होता.
ए सी पी एम मेडिकल कॉलेज धुळे येथिल एम बी बी एस च्या त्या स्कॉलर विद्यार्थ्यांनी तर होत्याच पण आपल्या कार्य व कर्तृत्वातून कॉलेजच्या इतिहासात मराठी साहित्यातील मानाचे पान कोरून ठेवले आहे.एम बी बी एस च्या दुसऱ्या वर्षी महाविद्यालयातील साहित्य विभागाच्या प्रमुख म्हणून सूत्रे हाती घेतल्यानंतर अभिनव उपक्रम राबवून कॉलेजचे नाव मोठे करण्यात त्यांचा वाटा होता.
ए सी पी एम कॉलेज ला वपूर्झा कार्यक्रमाचे आयोजन

वैद्यकीय शिक्षण चालू असतानाही कॉलेज gathering ला साहित्य विभागास दोन दिवस मिळत असतांना,त्यांच्या प्रमुख पदाच्या कार्यकाळात हे दिवस त्यांनी तीन केले.
त्यांचे आवडते लेखक व. पू.काळे यांची भेट घेऊन वपूर्झा ह्या अभिनव कार्यक्रमाचे आयोजन करून त्याचे निवेदन केले होते.
महाष्ट्रातील नामवंत साहित्यिक व.पु.काळे यांची साहित्य कार्यकारिणीतील इतर सदस्यांना सोबत घेऊन मुंबईला जाऊन त्यांची भेट घेतली व आमंत्रित केले.जिथे मुंगीलाही जायला जागा उरणार नाही अशा खचाखच भरलेल्या ऑडीटोरिअम मध्ये व.पूं. च्या कथाकथनाचा कार्यक्रम तर झालाच पण विद्यार्थ्यांनी अफलातून विचारलेल्या प्रश्नांना तितकीच मार्मिकतेने वपुंनी उत्तरे दिली.व याचे खुमासदार निवेदन डॉ. स्मिता मालपुरे यांनी केले.
त्यांच्या साहित्य सचिव ह्या कारकिर्दीत CPA in medical practice, तरुण तुर्क म्हातारे हे नाटक असे उत्तमोत्तम कार्यक्रमांचे आयोजन केले.आपली साहित्याची,वाचनाची,निवेदनाची आवड जोपासत,त्यात उत्तुंग कार्य करत असताना देखील शरीरशास्त्र ह्या विषयात नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटीत प्रथम क्रमांक येण्याचा बहुमान त्यांनी पटकावला.
वैद्यकीय अधिकारी म्हणून उज्वल कामगिरी
एम बी बी एस पूर्ण झाल्यावर कळवण येथील उपजिल्हा रुग्णालयात मेडिकल ऑफिसर म्हणून कार्यरत असतांना डॉ स्मिता यांनी आपले आरोग्यविषक कार्य मोठ्या श्रद्धेने केले.आपल्या जन्मभूमीत सुरू केलेल्या कार्याचा शुभारंभ हा सप्तश्रृंगी गडावर जाणाऱ्या भाविकांची सेवा,कर्तृत्व व श्रद्धा यांचा मिलाफ असलेला हा रोचक अनुभव असल्याचे डॉ.स्मिता सांगतात.शासकीय सेवेत सर्वाधिक मानाचा आनंदीबाई जोशी हा पुरस्कार रुग्णालयाला मिळवून देण्यात मोठा वाटा होता.रेड रिबन क्लब या संस्थेद्वारे किशोरवयीन मुलींसाठी आरोग्य विषयक कार्यक्रम, खेड्यातील स्रियांच्या आरोग्याविषयीच्या जागरुकतेसाठी अनेक चर्चासत्राचे आयोजन केले व उद्बोधन केले.डॉ.स्मिता यांनी परिसरातील आर.के.एम.ज्युनिअर कॉलेजसह इतर ठिकाणी मुलींचे आरोग्य,मुला, मुलींचे संबंध,त्यांचे पारिवारिक संबंधातील सुधारणा विषयक अनेकदा मार्गदर्शन केले.केवळ औपचारिक स्वरूपात काम न करता आपल्या कामातून समाजात काही चांगल्या गोष्टी साध्य व्हाव्यात हा उदात्त हेतू त्या कायमच बाळगत आल्या आहेत.

पदव्युत्तर शिक्षण व कामकाज
डॉ.स्मिता यांचे पुढील पदव्युत्तर शिक्षण विखे पाटील मेडिकल कॉलेज येथे झाले.त्यानंतर मुंबईला भाभा,नानावटी व वाडिया हॉस्पिटल व पुण्यात दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल ला रजिस्ट्रार म्हणून काम तर आता नाशिक मध्ये गेल्या 7 वर्षांपासून काम करत आहेत.
35,000 पेक्षा अधिक सोनोग्राफी
सध्या सातपूर येथील सर्व सोयींनी युक्त डायग्नोस्टिक क्लिनिक च्या त्या संचालिका आहेत.डॉ.बागुल व डॉ.वडगावकर ह्या नाशकातील नामांकित हॉस्पिटलमध्ये मानद सोनोलॉजिस्ट म्हणून कार्यरत. सोनोग्राफी च्या 4 D सोनोग्राफी ह्या गर्भ तपासणीच्या आधुनिक तंत्रज्ञानात विशेष रुची असून त्याद्वारे प्रत्येक गर्भवती स्त्रीला आपल्या पोटातले बाळ 4D सोनोग्राफीतुन बघण्याचा आनंद मिळावा हा हेतू. आतापर्यंत 35 हजार पेक्षा अधिक सोनोग्राफी केल्या आहेत.
सांगीतिक मैफिलीचे सूत्रसंचालन,:बहारदार निवेदन शैली
सूर विश्वास ह्या नाशिक येथे दर महिन्याला होणाऱ्या मानाच्या शास्त्रीय संगीताच्या मैफिलीचे सूत्रसंचालन दोन वर्षांपासून त्या करत आहे
गझलदीप व फ्युजन सुगम संगीताच्या कार्यक्रमांचेही सूत्रसंचालन त्या करतात.खरे तर कलाकारांना दाद आणि रसिकांची साद ह्या दोन्हीचा सुरेख मिलाफ घडवण्याचे काम ह्या बहारदार निवेदनशैलत असते.डॉ स्मिता यांचे कार्यक्रम प्रसंगीचे निवेदन हे श्रोत्यांना खिळवून ठेवणारे व कलाकारांची उमेद वाढवणारे ठरते, हे त्यांना मिळालेल्या अनेक सन्मानावरून दिसून येते.डॉ स्मिता ह्या उत्तम निवेदिका आहेत.
ललित लेख,कथालेखन
सध्या ललित लेख,कथालेखन सुरू आहे.आय एम ए च्या व्हाईस मासिकातून लेखन.उर्मी ह्या कथेला नवसंवाद फाऊंडेशन चा पुरस्कार.
महाराष्ट्र टाईम्स,इंडियन मेडिकल असोसिएशन,नवसंवाद ह्यात विविध सदर व कविता लेखन प्रकाशित.साहित्यक्षेत्रातील विभिन्न उपक्रम जसे ग्रंथ तुमच्या दारी ह्या माध्यमातून जी ग्रंथ चळवळ सुरू आहे,त्यात डॉ स्मिता यांचा सक्रिय सहभाग असतो.
रसिकांना बागडायला लावणारी कविता
डॉ स्मिता यांची कविता रसिकांना बागडायला लावणारी व गालावरची कळी खुलवायला लावणारी आहे असे म्हणावे लागेल.एका कवितेत त्या मांडतात
तू दवामधलं पाणी
तू श्वासामधली गाणी
कळ्यांनाही जाग येते
तू ग माझी फुलराणी,
शाळेच्या आठवणींविषयी त्या म्हणतात,
अगं शाळे,का गं शाळे
कसं सांगू तुला
काहीच न बोलता
तू किती दिलंस मला
पुढील काही ओळीतून त्यांनी घातलेली भावनिक साद,
भल्या पहाटे…सूर्याआधी…
मी तुला स्मरणार आहे.
आठवणींची ओंजळ
मी पुन्हा पुन्हा भरणार आहे.
डॉ.स्मिता यांचा कवितासंग्रह लवकरच रसिकांच्या भेटीस येणार असून त्यांच्या गायनाला जसा गोड सूर आहे,निवेदनाला मधुर धार आहे तशीच कवितेला ही चिंब भावनांच्या ओलाव्याची मधुर लय आहे
निःशुल्क शाडू मातीपासून ‘गणेश मूर्ती’ कार्यशाळा
डॉ.स्मिता ह्या दरवर्षी गरजू मुलांसाठी निःशुल्क शाडू मातीची कार्यशाळा घेत असतात.मुलांना हसत,खेळत बाप्पा बनवायला शिकवले जाते.हा आनंद गायनातून साजरा केला जातो.याप्रसंगी काव्य,गायनासोबत गणपती बनवायला शिकवले जाते व तोच गणपती घरी बसवायला सांगितले जाते.यातून पर्यावरण विषक जनजागृती केली जाते. पर्यावरण संवर्धनाचा संदेश त्यांच्या कृतीतून दिला जातो.मुलांच्या कोमल व निरागस भावनांचे उन्नयन करत,
इवले इवले हात माझे
मातीने भरू
आई आपण शाडूचा
गणपती करू
अशा खेळीमेळीच्या वातावरणात ही कार्यशाळा घेतली जाते.
डॉक्टर ऑन व्हील:उपक्रम
विदिशा प्रबोधन संस्थेमार्फत विविध शहरात महिला ग्रुप मध्ये 2 तास ऑनलाईन कार्यक्रम होतो.यात त्यांच्या आरोग्यविषयी शंकाचे निरसन करण्यात येते.यात डॉ स्मिता यांचा नियमित सहभाग असतो.
अजय अतुल सोबत गप्पा
अजय अतुल सारख्या दिग्गज संगीतकारासोबत गप्पा मारण्याचा योग आला असून जवळुन त्यांच्या गायन व संगीत विषयक कार्याची ओळख ह्या निमित्ताने डॉ.स्मिता यांना घेता आली.
पंचम ग्रुप च्या वतीने काम
गायक,संगीतकार,गीतकार ह्यांच्या वाढदिवशी किंवा जयंतीला पंचम ग्रुप च्या वतीने कार्य केले जाते.ह्या ग्रुपच्या वतीने त्यांचे गाणे गायले जाते.ह्या उपक्रमातही डॉ स्मिता यांचा नित्यनेमाने सहभाग असतो.
वैद्यकीय क्षेत्रात आपले कार्य उत्तुंग सुरू असतांनाच जीवनाच्या विभिन्न आघाडीवर अत्यंत सहजपणे त्यांचा असलेला वावर व त्या विभिन्न आघाड्यांवर आपल्या कार्यशैलीचा अमीट असा ठसा निर्माण करणाऱ्या डॉ स्मिता यांची ही वाटचाल खरोखरच खूप गौरवास्पद,प्रेरणास्पद अशी आहे.
©लेखक सुभाष पवार 9767045327
Thats my mom,
Truly proud of you mom.
Kudos!!😄
Ya.. Really.. That’s my Didi.. Proud of you.. Didi..
Wow.
Just Flawless Aatya!
So so proud of you ❤️
And very lucky to have you as our constant motivator
तु आमचा आधारस्तंभ आहेस 💜
जीवन गाणे गातच रहावे जीवन गाणे.
असा माझ्या ताईचा जीवन परीचय
खुप अभिमान आहे तुमचा
❤️
wow .. mam khup chan ahet .. always happy and smiling … khup chan vate jayva tum cha kdhe bgto tay ak possibility yete . asa che happy raha .. god bless u mam..love u so much mam
नमस्कार मॅडम,
आपण विविध क्षेत्रात काम करत असतांना जसे आपले नाव डॉ. स्मिता मॅडम तसेच आपल्या चेहऱ्यावर सतत स्मित हास्य ठेवुन मनापासुन काम करत असतात. जसे. घर, हॉस्पीटल असे व एखादा कार्यक्रम आपण अगदी आपल्या घराप्रमाणे ते काम पार पाडतात.
डॉक्टर हा अत्यंत गुंतागुतींचा व्यवसाय असुन सुद्धा आपण लेख लिहणे, गायण स्पर्धांत भाग घेणे, कार्यशाळा भरवणे असे काम आपण मनांपासुन करतात त्यामुळे आपल्या भावी जीवनांच्या वाटचालीसाठी अनंत अनंत शुभेच्छा……..!
विलास गावीत बोरपाडा.
9764949644
डॉ.स्मिता,नमस्कार
कळवण येथील डॉ जी व्ही मालपुरे यांच्या तुम्ही सुकन्या आहात. सार्वजनिक जीवनात वैद्यकीय सेवा देतांना आपली वाटचाल ही अतिशय कौतुकास्पद आहे.एक महिला उत्तम वक्ता,निवेदिका,कुटुंबवत्सल पत्नी,माता व तितकीच उत्तम डॉक्टर म्हणून मी नेहमी आपणास बघितले आहे. कळवणच्या या लेकीचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
आपल्या भावी वाटचालीस स्नेहसदिच्छा
दीपक महाजन,कळवण