खरकटी जमात सारी.. सायेब…एकच करा..!

0
खरकटी जमात सारी.. सायेब…एकच करा..!

खरकटी जमात सारी..
सायेब…एकच करा..!

खरकटी जमात सारी..
सायेब…
एकच करा..
सिलेंडर च़ं भाव
अजून दहा रुपयानं वाढवा…
पण.. गावा गावात व्हेंटिलेटर पोचवा…
एक येळ उपाशी राहिलं तरी चालन…पर..
पोरं..जगली पायजे आमची..
छत्तीस इंची छाती फुगवून
दावता कुणाला..

हितं..ओक्सीजन अभावी
बा ची छाती…सलती काळजाला
सायेब…
फोरजी च्या स्पीडनं…
लस पण आली असती नव्हं..
बारा कोटी लसीकरण
फक्त महिन्या भरात
झालं असतं नव्हं…
सायेब…
तुमच्या आधीच्या सायबांनी
तरी काय केलं वं येगळं?

पेट्रोल ७० वर आणलं..
अन् तुम्ही १०० वर नेलं
इथून तिथून सारखीच जमात
सर्व सामान्यांनी कशाकशात
करायची कपात?…
सायेब…
पोरं उपाशी.. महागाई उशाशी
इमुनीटी की काय ती पावर
वाढवायची कशी…?
सायेब….
चार दिसाचं बील लाख रुपये..
कुटनं आणायचा एवढा पैका?
तासाला हजारो…
रांडमुंड व्हत्यात बायका…

सायेब…
आता सोसत नाय
बोलल्या बिगर र्हावत नाय…
च्या इकला… तुमी…
हित पतूर बरं व्हतं…
पण..आता आमचा देश
इकाया निघाला हे बरं नव्हं!!
सायेब…
तुमी वाईट वाटून घेऊ नका
तुमच्या आधीची बी तशीच व्हती
उद्या येणारी बी तशीच असल
जळणार्या मढ्यावर राजकारण करणारी…
अन्…
मढ्याच्या
टाळूवरलं लोणी खाणारी
खरकटी जमात सारी….!!

©️®️✍🏼
अंजली राठोड श्रीवास्तव करमाळा.७७०९४६४६५३

Leave A Reply

Please enter your comment!
Please enter your name here