कोरोना विषाणूबाबत नागरिकांनी अफवांवर विश्‍वास ठेवू नये- महापालिका आयुक्‍त शेखर गायकवाड.

0

पुणे, दिनांक 5- चीनमधील कोरोना विषाणूबाबत माहिती मिळाल्‍यानंतर 20 जानेवारीपासून पुणे महापालिकेच्‍या नायडू हॉस्‍पीटलमध्‍ये आवश्‍यक ती खबरदारी घेण्‍यात आली. आतापर्यंत 81 रुग्‍णांनी या सेवेचा लाभ घेतला असून सुदैवाने एकाही रुग्‍णाला कोरोनाची बाधा झालेली नाही, अशी माहिती महापालिका आयुक्‍त शेखर गायकवाड यांनी दिली. कोरोना विषाणूबाबत पुणे जिल्‍ह्यातील नागरिक जागरुक आहेत, असे सांगून गायकवाड म्‍हणाले, पुणे मनपा प्रशासन दक्ष असून नायडू हॉस्‍पीटलप्रमाणे आणखी 10 हॉस्‍पीटलमध्‍ये अशी सुविधा निर्माण करण्‍यासाठी राज्‍य शासनाला प्रस्‍ताव पाठविला आहे. नागरिकांनी अफवांवर विश्‍वास ठेवू नये, घाबरुन जाऊ नये, परिसराची स्‍वच्‍छता ठेवावी, गर्दीच्‍या ठिकाणी जाणे टाळावे, खोकला,ताप येत असल्‍यास नायडू हॉस्‍पीटलशी संपर्क साधावा, असेही आवाहन गायकवाड यांनी केले.

Leave A Reply

Please enter your comment!
Please enter your name here