कोरोनामुळे संपूर्ण आरोग्य व्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात ताण !

0
कोरोनामुळे संपूर्ण आरोग्य व्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात ताण !

कोरोनामुळे संपूर्ण आरोग्य व्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात ताण !

प्रतिनिधी | पुणे

कोरोनामुळे संपूर्ण आरोग्य व्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात ताण आला असून कोरोना संक्रमण झाल्यास धड औषध उपचार सहज उपलब्ध होत नाहीत. तर लशीकरण सहजा सहजी होत नाही. कोरोनावरील प्रतिबंधात्मक लशींचा तुटवडा असल्याने वैद्यकीय अधिकारी व वैद्यकीय कर्मचार्यांना हातशी पांढर पेशे लोक लशीकरण करून कोरोनापासून जीव वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. यामध्ये गावगाड्यातील तळातील लोकांपर्यंत लशीकरणाची मात्रा पोचत नाही. कारण शहरातील मंडळी खेड्यापाड्यात जावून लशीकरण करून घेत आहे. संबधित ग्रामस्थांच्या वाट्याला लस उरत नाही. त्यामुळे लशी अभावी खेड्यापाड्यात कोरोनाचा धोका वाढला आहे.

राज्यसरकार कोरोना लशीकरणाचा मोठा आकडा सांगत आहे. यामध्ये ग्रामीण भागातील लशीकरणाचा आकडा सांगितला जात नाही. ग्रामीण भागातील कमी प्रमाणात लशीकरण होत असल्याने कोरोना संक्रमण ग्रामीण भागात वाढले आहे. प्रातिनिधीक चित्र बारामती तालुक्यातील शिर्सुफळ प्राथमिक आरोग्य केंद्रावर पहायला मिळाले. पहाटे पाच वाजल्यापासून येथे ग्रामस्थ लांब रांगा लावून होते. सकाळी आरोग्य कर्मचारी लशीकरणासाठी नावे नोंदवू लागला. नावनोंदणीसाठी तोबा गर्दी झाली. सोशल डिस्टसिंग न राहिल्याने कोरोना संक्रमणाचा धोका वाढला.

नावनोंदणीनंतर अनेक ग्रामस्थांना घरी जावे लागले. कारण केवळ १०० लोकांनाच लस मिळेल. असं सांगण्यात येत होते. मात्र प्रत्यक्ष लशीकरण सुरू झाल्यावर मोठ मोठ्या उंची गाड्यातून बारामती लोक दाखल होऊ लागले. कोणी स्वताःला आयएएस अधिकारी म्हणवून घेत होता. तर कोणी फ्रंट लाईन वर्कर मात्र ही माणसं गावगाड्यातील नव्हती. लशीकरणासाठी बारामतीवरून अवतरलेल्या लोकांना थेट लशीकरणासाठी प्रवेश मिळत होता. त्याच्याकडे गावाकडचे रापलेले चेहरे लशीकरणासाठी नंबर न लागल्याने हताश होऊन पाहत होते. याविषयी वैद्यकीय अधिकारी येसगर यांना विचारले असता, लशीकरणासाठी प्रथम येणार्यास प्राधान्य आहे. तर काही प्रमाणात फोनवरून नोंदणी करून घेतो. असे म्हणाले.

विलास कोकणे नावाच्या व्यक्ती म्हणाली की, लशीकरण करण्यासाठी वशीलेबाजी चालत असून आम्ही सकाळी सहा वाजल्यापासून लशीकरणासाठी थांबलो. पण पाठीमागून आलेल्यांचा नंबर लागतो. आज मला लशीकरण न करताच माघारी जावे लागत आहे.

ग्रामीण भागातील लशीकरणाती त्रुटी दुरूस्त करू.
ग्रामीण भागातील वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता लशीकरणाचा वेग वाढवण्याचा प्रयत्न आहे. शहराकडून खेड्यात जाऊन लशीकरण केले जात असेल तर त्याबाबत आरोग्य विभागाला सूचना केल्या जातील.

दादासाहेब कांबळे, प्रांताधिकारी, बारामती

Leave A Reply

Please enter your comment!
Please enter your name here