कोरोनाबाधित असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांना डिस्चार्ज, व्हाईट हाऊसमध्येच पुढील उपचार
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. त्यांना सैनिकी रुग्णालयातून व्हाईट हाऊसमध्ये शिफ्ट करण्यात आले आहे. स्वत: ट्रम्प यांनी याबाबत वृत्त दिले आहे. डॉक्टरांच्या मते ट्रम्प यांना आता व्हाईट हाऊसमध्ये उपचार होऊ शकतात.
डोनाल्ड ट्रम्प यांची तब्बेत पूर्वीपेक्षा चांगल्या स्थितीत आहेत. तथापि, ते पूर्णपणे स्वस्थ नाहीत. यामुळे त्यांना घरीच उपचार देण्यात येतील. संध्याकाळी 6 च्या सुमारास ट्रम्प यांना डिस्चार्ज देण्यात आला. आता ट्रम्प म्हणतात ऑक्सिजनची पातळी सामान्य आहे. त्यांना व्हाइट हाऊसमध्येच रेमडेसिवीरचा पाचवा डोस दिला जाईल. शुक्रवारी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची बातमी दिली. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमवेत त्यांची पत्नी मेलानिया ट्रम्प यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्वीट करुन याबाबद माहिती दिली.
आपली तब्येत बरीच असल्याचे सांगत डोनाल्ड ट्रम्प यांनी आपण लवकरच कोरोना मुक्त होऊन आणि अमेरिकेची सेवा करण्यास रुजू होईल याची खात्री दिली आहे. वॉल्टर रीड मेडिकल सेंटरमधील डॉक्टर आणि नर्सेस मला बरे वाटण्यासाठी प्रचंड मेहनत घेत आहेत. करोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या या सगळ्यांचं कार्य पाहून मी थक्क झलॉय !