कोरोनानंतर “एक मोहिम रायगडची…”

0
कोरोनानंतर

कोरोनानंतर “एक मोहिम रायगडची…”

आयुष्य छान आहे, थोडं लहान आहे. पण छत्रपती शिवरायांच्या मातृभूमीवर जन्माला आलो याचाच आम्हाला अभिमान आहे. किल्ले रायगड छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने, वास्तव्याने पावन झालेला महाराष्ट्रातील एक अजोड किल्ला. नतमस्तक होण्यासारखं पवित्र ठिकाण म्हणजे शिवतीर्थ रायगड! मी काही किल्यावर गेलो होतो परंतु रायगड पाहण्याचा योग आला नव्हता तो आला माझ्या “तुलसी आस्था”तील मित्रामुळे, त्यांनी रायगडला भेट देऊन महाराजांचा इतिहास ताजा करावा या हेतूने “मोहिम रायगड’ आखली..

रायगडला जाण्याची तयारी सुरु झाली…तुलसी आस्था मित्रांनी कधी यायचे, किती वाजता पोहचायचे, कधी गड चढायला तेथे खाण्यासाठी आपण काय काय घेऊन जाणार यापासूनचा तयारी झाली. बदलापूर मध्ये राहत  असल्यामुळे कामधंद्यानिमित्त मुंबई प्रवास सुरु असतो सकाळी अनेक जण ५ वाजता घर सोडतात ते रात्री ८ काय किंवा १० वाजता पुन्हा आपल्या घरी पोहचतात त्यामुळे प्रत्येकाच्या सवडीनुसार ६ फेब्रुवारी २०२१ रोजी रात्री १२ वाजता आम्ही १३ जण १७ सिटरच्या बसने प्रवास सुरु केला खर तर अनेक जण कामावरुन घरी येऊन निघाले होते परंतु त्यांच्या चेह-यावर थकल्याचे भाव नव्हते महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने आयुष्यात एकदा तरी जावं असं जगातील सर्वोत्तम ठिकाण. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी राजे यांच्या चरणस्पर्शाने पावन झालेली ही पवित्रभूमी प्रत्येकाने एकदा तरी पाहण्याची ओढ लागली होती.

सकाळी ५ वाजता आम्ही रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या हॉटेलजवळ पोहोचलो.. सकाळचा चहा घेतला व आम्ही सगळ्यांनी रायगड चढायला सुरुवात केली. रायगडाच्या पहिल्या पायरीवर नतमस्तक होऊन आम्ही ‘ छत्रपति शिवाजी महाराजकी जय, जय महाराष्ट्र ‘ या गर्जना करीत आम्ही रायगड चढायला सुरुवात केली. सकाळचे ५.३० वाजले असतील गड चढताना अंधार होता त्यामुळे (टॉर्च)चा वापर करत गड चढू लागलो..टॉर्च व एका हातामध्ये झेंडा असा अशी मोहिमेला सुरुवात झाली. राजगड चढताना कधी पाय-या तर कधी सफाट जमिन लागत होती दिड ते पावणे दोन तासाने आम्ही गडाच्या मुख्यदरवाज्यापाशी पोहोचलो. खूपच दमछाक झाली होती.. थोडा वेळ थांबलो..

तोपर्यंत सुर्योदय झाला होता गडावर सूर्यांची किरणे दिसत होती. समुद्राच्या सपाटीपासून ३०००फूट उंचीवर असलेले रायगड आम्ही सर केला होता. देवीचे दर्शन घेतले व गाईडच्या मदतीने रायगड बघायला सुरुवात केली. गाईड शिवाजी महाराज्याच्या इतिहास हळूहळू उघडू लागला होता तसे तसे आमचे उत्साह अधिक अधिक वाढत होता. रायगडावर आम्ही टकमक पॉइंट, हिरकणी बुरुज, नगारखाना, होळीचे माळ, महाराजांची समाधी, राजमहाल, जगदीश्वराचे मंदिर, धान्याची कोठारे, राज्याभिषक स्थळ, गंगासागर, अष्टप्रधान कार्यालय, वाघ दरवाजा, महाराज न्यायनिवाडा करायचे ते स्थळ अशी अनेक स्थळं आम्ही पाहिली. महाराजांची दूरदृष्टी यातून अनुभवायला मिळाली. हा मौल्यवान ठेवा जेवढा डोळ्यात साठवता येईल तेवढा साठवून ठेवत होतो.

गाईड यांने शिवाजी महाराजच्या राजभिषेकावेळी दोन इंग्रजी अधिकारी आले होते त्यावेळी त्यांनी गडावर हत्ती दिसले त्यांनी डोक्यात व मनात विचार सुरु झाला अरे एवढा रायगड चढायला म्हणजे जीव मुढीत घेऊन सांभाळत चढावे लागते परंतु राज्यांनी हे हत्ती कसे काय गडावर आणले असतील अशा विचार करुन त्यांनी तेथील सरदारांना विचारले त्यावेळ राज्याची दूरदृष्टी ऐवढी होती जेव्हा हत्ती लहान होते त्यावेळी गडावर आणले गेले होते त्यासाठी त्यांची रहाण्याची व आंघोळीसाठी हत्ती हौदही बांधला गेला होता.

आम्ही गड चढताना मनाला चटका लावणारी गोष्टी म्हणजे तेथे अजूनही गाढवाच्या मदतीने रेती व दगडाची ने-आण केली जात होती हे एकविसाव्या शतकामध्ये बघायला मिळाले हे दृश्य बघून माझ्या सारख्याला दु:ख वाटले. गड बघून झाल्यावर आम्ही तेथे आमच्या सोबत आणलेली भाकरी व ठेंचा खाल्ला  व थोडी विश्रांती घेत आज जड अंत:करण्याने आम्ही गड उतरण्यासाठी गडावर सुरु झालेली रोप-वे चा अनुभव घेण्यासाठी गेलो. रोप-वे ही जोग या कंपनीकडून चालवले जाते एकावेळी १२ व्यक्ती घेऊन जाण्याची व्यवस्था आहे. रो-पवे ने आम्ही सहा मिनिटामध्ये गडावरुन खाली उतरुन आलो.. अशी एक कोरोनानंतरची ‘रायगड मोहिम’ यशस्वी केली. 

  • विश्वनाथ खांदारे (9987642793)

Leave A Reply

Please enter your comment!
Please enter your name here