कोंदण”

0
कोंदण हा कवितासंग्रह

कोंदण हा कवितासंग्रह नुकताच वाचला. कवयित्री विद्या जाधव यांचे माहेर कोरेगांव असल्याने हा कवितासंग्रह माहिती होऊन वाचनात आला.खुप सुंदर कविता आहेत यात.
तसा कवितासंग्रह मोठा आहे.एकूण नव्वद कविता आहेत.यातील बहुतेक कविता दुष्काळ,बळीराजाची व्यथा,स्त्रीयांचे जीवन चित्रीत करतात.ईमान ही कविता शेतकऱ्यांच्या आत्महत्यावर आधारित वास्तव चित्रण आहे.याचबरोबर बऱ्याच कविता कवितेविषयीच म्हणजेच कवितेमागची प्रेरणा,शब्दांचे महत्व याबद्दल आहेत.अक्षरधन या कवितेत त्या लिहितात,
“शब्दांचेच अलंकार,
अक्षरांची हिरेमाणके,
मौल्यवान प्रमाणके”

यातून त्यांची अक्षरधनावरील श्रद्धा दिसून येते.त्यांचे लिखाणात खुप नेमक्या शब्दाचा वापर आढळतो.काही कविता निर्मळ प्रेमाविषयी आहेत.
बाप,माय आणि भाऊंराया या कविता प्रेमाने ओथंबलेल्या आहेत.फाटका प्रपंच ही कविता शेतात कष्ट करुन कुटुंब सांभाळणाऱ्या वडिलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करते.वडिलांच्या कष्टाची जाणीव निर्माण करते.माय ही कविता आईने वडिलांचे माघारी कष्ट घेवून संसाराचा गाडा यशस्वीपणे ओढल्याबद्दल लिहिली आहे.त्यात त्या शेवटी परमेश्वरास प्रार्थना करतात,
“चिंब न्हावुं दे सुखात तिजला,
ना कधी दिसावी दुःखात.”

याचबरोबर भाऊराया या कवितेत त्या वडिलांचे छत्र हरपलेल्या बंधुराजास स्वतः स्वतःला जपणयास सांगतात.त्याआपल्या भावास मुलाना चांगले शिक्षण आणि संस्कार देण्यास सांगतात.या तिन्ही कवितेमधुन कुटुंबत्सलता दिसून येते.या कविता जीवनाचा खरा अर्थ सांगतात.
माहेर ही कविता सातार्‍याचे निसर्गवैभव, गड किल्ल्यांचे वैभव ,सैनिकी परंपरा, आध्यात्मिक महत्व याचे अप्रतिम वर्णन करते.
बहुतेक सर्व कवितेमधुन ग्रामीण जीवन आणि आयुष्यातील संघर्ष दिसून येतो.गुढी संसाराची, मौज जगण्यातील,फक्त जगायचय या कविता खुप सकारात्मक आणि आशावादी आहेत.संकटाशी दोन हात करुन उभे राहनयचे बळ यातून मिळते.
भिकारी ही कविता माणूस कर्माने दरिद्री होतो असा संदेश देते.माणसाने आळसाचा त्याग करुन सत्कमें केली पाहिजेत.मिळालेल्या गोष्टीनचे महत्व जाणण्यास ही कविता प्रवृत्त करते.

भूक ही कविता गरीबी आणि भूक यांच्यातील भीषण सत्य,गरीबीच्या भाळवर भुकेची भयाण रेषा या वाक्यात चित्रीत करते.तसेच मरणाचे स्मरण असावे ही कविता मरण हे जीवनाचे अंतिम सत्य असल्याचे जाणवून देते.अस्मिता ही कविता वयात येणाऱ्या मुलीला मजबूत आणि कणखर राहण्याचा मौलिक मंत्र देते.ही कविता या वयात येणाऱ्या मुलीसआईपासून काहीही लपवू नये असे सांगते. विलोभनांपसुन दूर राहण्यास सांगते.
अलंकार ही कविता चारित्र्य हा स्त्रीचा मोठा अलंकार आहे हे अधोरेखित करते.त्यांच्या कवितांमधुन जिजाबाई, हिरकणी यांचा आदर्श समोर उभा राहतो.अंगाई ही कविता नोकरी करणाऱ्या स्त्रीमनाची घुसमट व्यक्त करते.

कवयित्री या आदर्श प्राथमिक शिक्षिका आहेत.त्यांनी संदेश या कवितेतुन मुलाना आईपणाच्या भूमिकेतुन आयुष्य चांगले जगणयासाठी कळकळीने काही संदेश दिले आहेत.विद्यार्थ्यानी या प्रमाणे वागल्यास त्यांचे आयुष्याचे सोने झाल्याशिवाय राहणार नाही. थांग भविष्याचा ही कविता बचतीचे महत्व सांगते.दुष्काळ असताना लग्नसमारंभ,यात्रा,जत्रा इत्यादी साधेपणानी का साजरे करू नयेत यावर विचार करण्यास प्रवृत्त करते.कर्ज काढून सण साजरे करण्यात अविचार आहे,यावर प्रकाश टाकते.
पंढरीच्या पांडुरंगा, देव,हे देणे ईश्वराचे या कवितेतुन कवयित्रिची परमेश्वरावर श्रद्धा असल्याचे दिसून येते.

या गतिमान जीवनप्रवासात लोकांना एकमेकाची विचारपुस करायला वेळ नाही.त्यामुळे नात्यामधीलआपलेपणाची ओल कमी झाल्याची खंत ही खंत या कवितेत व्यक्त होत आहे.मोल या कवितेत खर्‍याखुर्‍या कष्टाचे मोल कोणाला राहिले नसल्याची खंत व्यक्त केली आहे.तडजोड ही कविता आयुष्यातील प्रत्येक टप्यावरील तडजोडीचे महत्व विशद करत आहे.याचे अनुकरण केल्यास सर्वांचे आयुष्य सुखकर होईल यात शंका नाही.
एकंदरीत सर्व कवितेमधुन वात्सल्य,प्रेम ,माया,आपुलकी,

कर्तव्य,तडजोड,प्रामाणिकपणा,जिद्द,कष्ट इ बावनकशी जीवनमूल्यांची चांगली उधळण आहे.आयुष्य सरळ, साधे आणि सोपे जगण्याचा मार्ग आहे यात.
कोंदण ही कविता स्रिला सौभाग्याच्या कोंदणाचे महत्व लक्षात घेवून आपले आयुष्य या कोंदणात अधिक कसे उजळून निघते यावरती प्रकाश टाकते.
“कोंदण” हा कवितासंग्रह वाचताना आनंद झाला.मला जसा उमगला तसा अभिप्राय लिहिलेला आहे.

  • जयवंत रामचंद्र बर्गे.
    कोरेगांव सहायक अभियंता श्रेणी 1,जलसंपदा विभाग,महाराष्ट्र शासन.

Leave A Reply

Please enter your comment!
Please enter your name here