केंद्र व सर्वराज्यसरकारांनी एकविचार धारणेने देशविकासाला चालना द्यायला हवी !

0

देशाच्या राजकारणामध्ये चाललय काय देशांमध्ये एक वेळ होती एक काळ होता जेव्हा सगळे ची सगळे नेते एकत्र एकाच्या पाठोपाठ चालत होते कधीतरी देशाच्या विकासासाठी तरी मला आठवतंय 1999 ला  कारगिल युद्धादरम्यान 1993 ला लातूर भूकंपझाल्यामुळे तसेच आता 370 लाही यायला हवे होते देशातील नेत्यांनी राजकारण्यांनी विचारधारा बदलायला हवी आज भारतामध्ये एन आर सी च्या बद्दल लोकांमध्ये जो काही गैरसमज पसरवण्यात आला आहे तोच गैरसमज दूर व्हावा करिता त्याची अधिकाधिक माहिती प्रसारमाध्यमांनी व नेत्यांनी ही द्यायला हवी!? सरकार ही सर्व जनतेचीच आहे जनता हीच सरकार आहे लोकशाहीचे देश म्हणून महान भारत  देशाची ओळख आहे

राजकारणात गुन्हेगारीचे प्रमाण काळजी करण्याइतपत वाढल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 13 फेब्रुवारी  2020 रोजी कलंकित उमेदवाराची ची माहिती जाहीर करा सर्व राजकीय पक्षांना त्यांच्या उमेदवारी विरुद्ध न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या गुन्हेगारी प्रकरणाची सर्व माहिती पक्षांच्या संकेतस्थळावर अपलोड करण्याचे आदेश दिले उमेदवाराविरुद्ध गुन्हेगारी प्रकरणे असतानाही त्यांना उमेदवारी देण्यास मागील कारणे राजकीय पक्षांनी संकेतस्थळावर अपलोड करण्यास न्यायालयाने सांगितले आहे त्याप्रमाणे माहिती जाहीर करावी व देशाच्या सर्वांगीण विकासासाठी आपापल्या पक्षांमध्ये राजकारण्यांनी स्वतः एक पारदर्शकता निर्माण करावी व देशहिताच्या विकासासाठी आपल्या अंतर्मनातून एखाद्या मोठ्या कंपन्यांची निर्मिती  सरकारच्या माध्यमातून करण्यात यावी त्यामुळे कोट्यावधी लोकांना नोकरी मिळण्यास सोयीचे ठरेल आजही देश बेरोजगारीच्या माध्यमातून लाचारी पत्करतो आहे अनेक नवजवान सुशिक्षित बेरोजगार पडून राहिलेले आहेत त्यांना केवळ काम धंदा नोकरी नसल्याने त्यांच्या पुढे त्यांच्या जीवनमानाचा प्रश्न उभा राहिलेला आहे सर्व राज्य सरकारने व केंद्र शासनाने एकत्रित निर्णय घेऊन देश विकासासाठी एकत्रित विचार धारा पुढे आल्या पाहिजेत असे संबंध भारत देशातून 20  30  व चाळिशीतील वयातील युवकतून लोकांचे मत व्यक्त होत आहेत  भारत देश स्वतंत्रसंग्राम पूर्वी महात्मा गांधी व चंद्रशेखर आझाद यांनाही मानणारा वर्ग होता त्यावेळी सर्व जनताही भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढले होते राजकारणातील विचार धारणा त्या पक्षाची भलेही वेगळी असो परंतु देश विकासासाठी सर्व पक्षांनी सर्व राजकारण्यांनी एकत्र येण्याची हीच वेळ आहे स्वराज्यासाठी लढणारे प्रत्येकजन हिंदुस्तानी होता  स्वराज्यासाठी राजे-महाराजे एकत्रित येत होते जेव्हा एकत्र आले नाही तेव्हा बाहेरच्या मूर्खांनी आपल्यावर हुकूमत गाजवलेली आहे!

Leave A Reply

Please enter your comment!
Please enter your name here