काकी भिंगारदिवे अमर रहे ! अमर रहे!!अमर रहे !!!

0
काकी भिंगारदिवे अमर रहे ! अमर रहे!!अमर रहे !!!

काकी भिंगारदिवे अमर रहे ! अमर रहे!!अमर रहे !!!

स्वातंत्र्य पुर्व काळातली जोडलेली नाती! काकीच्या जाण्याच्या दुःखाचे अस्रु पोपटराव ढाळती!

खादीच्या परिवारातील काकीच्या स्मृतीस अस्रुच्या हुंदक्याने खाकीने पोपट बाबुराव लोंखंडे यांनी आत्याला दिलेली सलामी
१९१० साली शैक्षणिक क्रांतीची बिजे रूजविणाऱ्या गेणुजी लोखंडे परीवाराच्या बाबतीतील सत्य इवलेसे बीज लावियीले दारी तयाचा वेलू गेला गगनावरी

वैद्यकिय शैक्षणिक यांत्रिकी देशसेवेची पोलीस सेवा अशा अनेक क्षेत्रात या परिवाराने झेप घेतली आहे.छबुताई उर्फ काकी लक्ष्मणराव उर्फ तात्यासाहेब भिंगारदिवे यांचे २४जुलै २०२१ ला दुःखद निधन झाले.हा शोक आवरता येण्यासारखा नाही या शोक भावनेत आज ज्यांच्या स्मृती आपण जपणार आहोत. त्यांच्या आठवणी जाग्या केल्याच पाहीजे.

महाराष्ट्रातील समाजाच्या राजकिय कारकिर्दीत पहिला मानाचा तुरा खोवणारे आमदार लक्ष्मणराव उर्फ तात्यासाहेब बाबाजी भिंगारदिवे विटा खानापुर हे पहिले आमदार त्याकाळी एल. एल.बी उतिर्ण झालेले स्वातंत्र्य लढ्यातले अग्रगणी त्याकाळी सांगली सातारा असे विभक्त नव्हते.सातारा हे एकच त्यामुळे तात्यासाहेबाच्या शिक्षणाचा स्वभावाचे आद.यशवंतराव चव्हाण यांना कौतुक अभिमान वाटत होता.त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील आद.यशवंतराव चव्हाणा बरोबरच्या पहिल्या फळीतले तात्यासाहेब हे एक होते.त्यांची सौभाग्यवती होण्याचे भाग्य दिवंगत आद.छबुताईना लाभले.हा नासिक जिल्हाचा देखील त्याकाळी गौरव होता

खरे तर त्याकाळी अनेक घरात कोडकौतुकाने घेणारे नाव छबुताई, छबुताईचे लोखंडे घराणे हे देखील त्याकाळापासुन आज पर्यत तोलामोलाचे आहे.मुळचे सातारा जिल्ह्यातील म्हसवडचे असले तरी स्वातंत्र्य क्रांती मध्ये अनेक परिवार भुमिगत होत असे, असेच नासिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात करंजगाव या गावी भुमिगत झालेले.पुंजाजी गेणुजी लोखंडे यांचा परिवार

गेणुजीला तीन मुले भिमाजी, नामदेव व सखाराम यांना दोन मुले दोन मुली नामदेवाची एकुलती एक कन्या छबुताई या त्याकाळी पाचवी शिकलेल्या.१९३३ साली जन्मलेल्या काकी रूढी परंपरा दुर करून लोखंडे परिवारानी कन्येला शिकविले. त्याकाळात देखील मुलीच्या शिक्षणाची महती जाणणारे लोखंडे परिवार व नासिक जिल्हा.

भिमाजीची मुले दामोधर, बाबुराव हि मुले महाराष्ट्राभर समाजात परीचित होती.बाबुराव हे पाटबंधारे खात्यात शिर्डीला होते.त्याकाळचे ते मल्ल देखील होते.एकाच दमात चरवीभर दुध ते प्यायचे,त्यांचेच पोपटराव हे सुपुत्र महाराष्ट्र पोलीस खात्यात असिस्टंट पोलीस कमिशनर म्हणून निवृत झाले त्यांचे वास्तव्य पुण्यात आहे.

दामोधर उर्फ आप्पा हे शिक्षक आनंदा लक्ष्मण लांडगे गुरूजी, गुलाबराव भिमराव दोडके गुरूजी अनेक शिक्षक त्याकाळी होते.
माझे वडील रामचंद्र तात्याबा धगाटे त्यांना कोणी मास्तर म्हणायचे कोणी बापुसाहेब म्हणायचे कृष्णराव खंडेराव बंदरे नानासाहेब,बी.टी.अहिरे.शांताराम अहिरे मनोहर धगाटे.हे शासकिय सेवेत असणारे तर आर.जी साठे के.टी खरे सामाजिक कार्यकर्ते अशी नासिक जिल्हाची शैक्षणिक क्षेत्रातील प्रगती पथावरील दौड सुरू होती.

एल.बी.तथा तात्यासाहेब हे संपुर्ण महाराष्ट्राभर दौरा करायचे जन सामान्याच्या सामाजिक रिती रिवाजा प्रमाणे त्यांच्या विवाहाचा विषय निघाला.त्यांना शिकलेली मुलगी उपेक्षित होती छबुताईचे त्याकाळी पाचवी पर्यतचे शिक्षण झाले होते.एकुलती एक कन्या आजोळ गंगापुरचे वाघ परीवातले आई राधाबाई त्याच शेजारील दुगाव आमचे गाव काकी माझ्या वडीलाना भाऊ मानत होत्या.

सर्व परिवारातच नव्हे तर जिल्ह्यात कोडकौतुकाने वाढलेल्या छबुताई या शरीरयष्टीने बांधेसुद होत्या १९४५साली लग्नाच्या वेळी वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी देखील त्या उपवर कन्ये सारख्या दिसत होत्या. शैक्षणिक क्षेत्रात आघाडीवर असणारे एकतेने राहणारे घर बाबुरावाचा शासकीय सेवेमुळे बहुजन समाजातील बहुमान त्यामुळे तात्यासाहेबाच्या घरच्यानी देखील होकार दिला.

विट्यावरून आलेल्या पाहुणे मंडळीची करंजगावच्या पाटलानी स्वतःच्या वाड्यात या परीवाराची राहण्याची व्यवस्था केली. पुढे येणे जाणे लग्नाची तिथी निश्चित करणे अशा रितीने १९४५ साली नासिक जिल्हा व सातारा सोयरिकेतुन एक झाले.नासिकची कन्या विट्याची केवळ सुनच झाली नाही तर महाराष्ट्राची काकी झाली.

तात्यासाहेबाचे घरात मुलाचे वसतिगृह होते.आईच्या मायेने काकी या स्वतः स्वयंपाक करून मुलाना खाऊ घालीत होत्या हा अनुभव मी स्वतः घेतला माहेरच्या भावाचा मुलगा म्हणुन तात्यासाहेब व काकी मला घास भरवित होते.हि सत्यता आहे मी प्र.दे.उमाप यांचे बरोबर विट्याला गेलो होतो.

खरोखरच मायेचा घास भरविणाऱ्या काकी आज या विश्वात नाही.त्यांची स्मृती मात्र सदैव दरवळत राहिल.प्रसिद्धी पेक्षा सिध्दी काकी जाणत होत्या प्रसिध्दी पासुन त्या कोसो दुर होत्या.परंतु कर्तव्याच्या भावनेतुन सर्वाच्याच अंतःकरणात आहेत. राहतील भावपूर्ण आदरांजली

शोकाकुल पोपटराव लोखंडे लोखंडे ए.सी.पी.परीवार
शब्दांकन आण्णा धगाटे परीवार
वैरागर नासिक परिवार, अनिल शिरसाठ परिवार,सुमनताई आव्हाड परिवार,ससाणे परिवार,
तमाम महाराष्ट्रातील समाजबांधव धगाटे परीवार
वैरागर नासिक परिवार, अनिल शांताराम अहिरे परिवार
अनिल शिरसाठ परिवार, सुमनताई आव्हाड परिवार, ससाणे परिवार,अशोक साठे साठे परिवार दिनकर लांडगे लांडगे परिवार कैलास दोडके दोडके परिवार तमाम महाराष्ट्रातील समाजबांधव

Leave A Reply

Please enter your comment!
Please enter your name here