ओरिजनल ते ओरिजनलच…. शब्दांकन : विपुल पाटिल

0
ओरिजनल ते ओरिजनलच…. शब्दांकन : विपुल पाटिल

ओरिजनल ते ओरिजनलच….
शब्दांकन : विपुल पाटिल

झाडावर उगवणाऱ्या झाडाला ‘बांडगूळ’ किंवा परपोशी वनस्पती असेच म्हणतात… या उदाहरणाला कारण म्हणजे ‘#चांडाळचौकडीच्याकरामती’ या युट्युब वरील वेबसिरीजने जगभरातील मराठी रसिकांना अक्षरशः वेड लावलं आहे. दर आठवड्याला रविवारी प्रदर्शित होणाऱ्या खुमासदार एपिसोडची लोक आवडीने वाट पाहत असतातं.. त्यांचे 50 एपिसोड पूर्ण होण्याअगोदरच जवळपास पावणेसात लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले आहेत… यातील कलाकार उघड चेहर्‍याने बाहेर पडले, तर सेल्फी घेणाऱ्यांची निव्वळ झुंबड उडते…या सर्व यशाचा फायदा घेण्यासाठी त्यातील नावाच्या आणि पात्रांच्या अभिनयाच्या नकला करणाऱ्यांचे अक्षरशः पेव फुटले आहे….

यांच्या प्रसिद्धीचा फायदा घेऊन आपलीही पोळी भाजावी किंवा प्रसिद्धी मिळवावी हाच उद्देश या नक्कलकारांचा… परंतु नक्कल केली तरी अभिनयाची अक्कल येईल ही अपेक्षा फोलच ठरणार… कारण हे कलाकार वीस वर्षापेक्षाही अधिक अभिनयाची तपस्या करत आहेत…. कोणताही घडीव दागिना सुबक तेव्हा होतो जेव्हा तो आगीच्या भट्टीतून प्रवास करून हातोड्याचे ठोके खावून तयार होतो ….. मालदारांच्या उपेक्षा आणि रसिकांच्या मोठ्या अपेक्षा याच्या हिंदोळ्यावर झुलत-झुलत या कलाकारांनी आजचे यशोशिखर गाठले आहे. हात आकाशाला टेकले तरीही यांचे जमिनीवरचे पाय हालले नाहीत… खूप वर्षांपासून आमचे या कलाकारांशी घरोब्याचे संबंध आहेत… संबंध स्नेहाचे असल्याने त्यांचे यश चोरण्याचा प्रयत्न कुणी करत असेल तर रागाने तिळपापड होणारच ना….

रसिकांना आपल्या कलेने वेड लावणाऱ्या या कलाकारांशी आमच्या ऑफिसमध्ये चर्चा झाली. जेव्हा यांच्याकडून काही डुप्लिकेट कलाकारांच्या मर्कट लीलांबाबत बाबत खदखद व्यक्त झाली….. तेव्हा मनातून एकच भावना आली… ‘नकली असतं ते काही काळासाठी एकवेळ विकतं परंतु जे असली असतं तेच कायमच टिकतं’…….

पाडवा आणि भाऊबीजीच्या सर्वांना खुप खुप शुभेच्छा

Leave A Reply

Please enter your comment!
Please enter your name here