एक विकासात्मक पत्रकारितेची कास धरून,एक सच्चा संपादक कोणी होणे अवघडराव !

0
एक विकासात्मक पत्रकारितेची कास धरून,एक सच्चा संपादक कोणी होणे अवघडराव !

एक विकासात्मक पत्रकारितेची कास धरून,एक सच्चा संपादक कोणी होणे अवघडराव  !

एक विकासात्मक पत्रकारितेची कास धरून,एक सच्चा संपादक कोणी होणे अवघडराव  ! राजकारणी चांगले नसतात, त्यांच्या ओठात एक आणि पोटात एक असते आम्ही घाबरणार नाही,  कर नाही तर मला डर नाही ,काही होणार नाही तळमळ त्याच्यासाठी होते आणि त्या लोकांच्या ,त्या गल्लीतील,त्या रस्त्याच्या,नाल्याच्या  समस्यांचे कोणी पाडे आमच्या जवळ बोलून दाखवले,किंवा सार्वजनिक अन्य प्रश्न व ती कळकळ पाहून मला जणू दहा हजार हत्तीचे बळ येते मी जातीचा, ना भावकीतला, ना रक्ताच्या नात्यातला तरीही त्यांना माझ्यासाठी काही लोकांना ,मित्रांना 
! माझी कळकळ वाटवी, माझ्या काळजीने त्यांची झोप उडावी, व त्यांच्या डोळ्यात पाणी यावे  हेच ‘भावनगरी”चे खरे भांडवल आहे !

    भावनगरी ने काय कमावले ? याचे खरे उत्तर हे आहे. भावनगरी असे अंत:करणापासून निखळ प्रेम करणारी असंख्य माणसं ,व चिरंतर विश्वास मिळवलेला आहे. त्यांना  आजही भावनगरी चे खुप आत्मियता वाटते, त्यांना भावनगरी साप्ताहिक आणि न्युज पोर्टल आपले हक्काचे वाटते, त्यांना माझ्या कडून सत्य,विकासात्मक कालानुरूप लिखाण हवे हवे  वाटते. अनेकजण भेटून, फोन करून सतत सांगत असतात की, “काळजी घ्या, स्वत:ला जपा !” सामान्य माणसांची हिच दुवा भावनगरी ची ताकद आहे. भावनगरी वर आणि माझ्यावर निस्पृह प्रेम करणा-या असंख्य लोकांचा विश्वास भावनगरीतुन जागृत आहे तो असाच बुलंद होत राहिल.

मग कुणीही कितीही आमच्याबद्दल काहीही पुरावे द्याव्यात, कितीही संभ्रम ,लोकातगोंधळ माजवला, वआम्हाला दडपण्याचा प्रयत्न करावा, कोणी कितीही कांगावा करून लबाड ठरवण्याचा प्रयत्न करावा. भावनगरी ने आजवर केलेल्या जनतेसाठीची लढाई कधीच थांबवणार नाही. भावनगरीचे वृत्तपत्र कधीच दबणार नाही. आम्ही सामान्य माणसासाठी असेच आवाज उठवत राहू. “ही लढाई आहे व्यवस्थेत चिरडल्या, भरडल्या व लुटल्या जाणा-या प्रत्येक गोर-गरिप्रत्येक दीन-दुबळ्याची आणि  दीन-दुखितांची. ज्यांचा ज्याचा आवाज दडपला जातोय, चिरडला जातोय त्या प्रत्येकाची ही लढाई आहे. अखेरच्या श्वासापर्यंत आम्ही ही लढाई अशीच लढत राहू. ही लढाई लढत असताना, सामान्य माणसांचा आवाज बुलंद करत असताना वाट्टेल ते झाले तरी चालेल. आजवर पत्रकारिता करताना कधीच नफा-तोट्याचा विचार केला नाही. स्वत:च्या घरादाराचा, बायका-मुलांचा आणि स्वत:च्या जीवाचाही विचार केला नाही. एका हातात लेखणी आणि दुस-या हातात जीव घेवून हे काम अव्याहतपणे सुरू आहे.

 पत्रकारिता करताना आम्ही जाहिरातीच्या कुंडल्या काढून कधीच बसत नाही. हा आपला जाहिरातदार आहे का ? हा आपल्याला जाहिरात देणार आहे का ? मग त्याला खुष ठेवावे, त्याची चापुलसी करावी, त्याच्यासमोर हुजरेगिरी करावी, त्याचे तळवे चाटावेत असे कधीच केलेले नाही. एखादा जाहिरात देत नाही म्हणून त्याला त्रास द्यावा, त्याला टार्गेट करावे अशी विकृत प्रवृत्ती आमची कधीच नाही. अन्याय करणारा, लोकांना त्रास देणारा, नाडणारा कुणीही असो. तो जवळचा असो, लांबचा असो, कोणत्याही पक्षाचा असो त्याला आम्ही सोडले नाही. प्रशासनातले अधिकारी खुष ठेवण्यासाठी त्यांचीही कधी चाटूगिरी केली नाही. ते जेव्हा बरोबर असतील तेव्हा बरोबर आणि जेव्हा चुकीचे असतील तेव्हा चुकीचेच म्हंटले आहे.

स्वार्थासाठी कुणा साहेबांचे किंवा कुणा नेत्यांचे तळवे कधीच चाटले नाहीत आणि कुणापुढे कधी शेपट्याही हलवल्या नाहीत. आम्ही बांधिल आहोत ते लोकांना, आम्ही बांधील आहोत ते भारतमातेला. या उपर कुणाची मर्जी राखण्याचा काय संबंध ? ख-याला खरे आणि खोट्याला खोटे म्हणायची हिम्मत आमच्यात नेहमीच आहे. “सत्य असत्याशी मन केले ग्वाही । मानियले नाही बहूमता ।।” तसेच “आम्ही विठ्ठलाचे वीर फोडू कंटकांचे शीर ।। हा जगदगुरू तुकोबाराबारांयाचा वारसा घेवून आमची वाटचाल चालू आहे. अनेकवेळा आम्ही ज्यांच्या विरोधात लिहीतो, बातमी लावतो त्यांचे पित्त खवळते. पण त्यांच्या विरोधात असणारे खुष असतात. स्वत:च्या सोईने बातमीकडे आणि आमच्या पत्रकारितेकडे पाहणा-यांना आणि तसे आरोप करणा-यांना उत्तर द्यायची गरज नाही.

आम्ही प्रामाणिक आहोत याचा खुलासा द्यायचीही आम्हाला गरज नाही. प्रामाणिकपणाचे व इमानदारीचे कँम्पेनिंग करावे इतकी लेचीपेची इमानदारी आमची निश्चितच नाही. आमच्यावर जनता जनार्धनाचे आशीर्वाद  राहतील ,तुम्हां सर्वांचे हे प्रेम असेच राहू द्या. तुमचे आशिर्वाद सदैव सोबत राहू द्या. हिच भावनगरीची  खरी दौलत आहे.  धन्यवाद !
संपादक भावनगरी

Leave A Reply

Please enter your comment!
Please enter your name here