एकतरी कॉन्टॅक्ट नंबर असावा

0
एकतरी कॉन्टॅक्ट नंबर असावा

एकतरी कॉन्टॅक्ट नंबर असावा

सध्याची स्थिती अशी आहे की कोरोना हो ना हो.माणूस आतून एकटा होत चालला आहे.घरात आपण किंवा एकादा Positive आला आला की तो आपल्याच लोकांपासून दूर राहू लागतोय.काळजी लागते की आपल्यापासून कोणा जवळच्याला होऊ नये.लक्षणे काहीही असो घाबरल्या सारखे होऊन जाते.आयुष्यातील काही काळ डोळ्यापुढे उभा राहतो नातलग अठवतात.पुढच्या काही दिवसात काय होईल काय नाय आपले कसे होईल याची काळजी लागते अन् याच काळजी मुळे स्वतः खचून जाऊन मेंटली डिस्टर्ब होते मग तब्येत ढासळते अन् एका एकी होत्याचे नव्हते होऊन जाते.ह्या काळात स्वतःची जाणिव राहत नाही ,दुर्लक्ष होते, टेन्शन येते. अन् मग टेन्शन मध्ये heart attack , blood clotting, घाबरून astama attack या गोष्टी मुळे जीव गमवावा लागतो.

घरातले लोक शेजारी असूनही मन मोकळे करता येत नाही.हातात मोबाईल असूनही त्याकडे पाहत बसावे लागते, काय करणार या धकाधकीच्या जीवनात पैसे कमावण्याच्या नादात आपण इतके एकटे पडलोय की आपल्या कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये आपल्या सोबत 2/3 तास गप्पा मारणारा एकादा मित्र पण नाही आपल्याला, ज्याच्या पाशी मनमुराद गप्पा मारून मन हलके करायला.मनातील ओझे घरात सांगू शकत नाही कारण घरच्यांना आजाराचे टेन्शन असते. अश्या वेळी कोणचं कमी येत नाही.कारण 1 ही जन नसतो की ज्याला आपण फोन लाऊन 2/3 तास गप्पा मारू शकतो.

सांगायचे तात्पर्य ऐवढेच की आता तरी जाणीव होऊ द्या की पैसा हे सर्वस्व नाही.जगायला अश्या वेळी एकादा फोनच मनाला धीर अन् जगायचे धाडस देऊ शकतो.

म्हणूनच एकतरी कॉन्टॅक्ट नंबर असावा

मानस पाटील
बारामती

Leave A Reply

Please enter your comment!
Please enter your name here