इराण मध्ये तब्बल अडीच कोटी लोकांना कोरोनाची लागण : राष्ट्रपती हसन रुहानी

0
इराण मध्ये तब्बल अडीच कोटी लोकांना कोरोनाची लागण : राष्ट्रपती हसन रुहानी

इराण मध्ये तब्बल अडीच कोटी लोकांना कोरोनाची लागण : राष्ट्रपती हसन रुहानी
इराण मध्ये कोरोनाचं संक्रमण सुरु झाल्यापासून तब्बल अडीच कोटी लोकांना कोरोनाची लागण झाली असेल असा अंदाज राष्ट्रपती हसन रुहानी यांनी वर्तवली आहे. आत्ताच्या घडीला इराणमध्ये ऑफिशियली 2 लाख 71 हजार कोरोनाबाधित आहेत. मात्र, प्रत्यक्ष हा आकडा कितीतरी पट जास्त असेल असं राष्ट्रपती रुहानी यांनी सांगितलंय.
व्यवस्थित काळजी घेतली नाही तर इराणमध्ये येत्या काही दिवसांत आणखी तीन ते साडेतीन कोटी लोक कोरोनाग्रस्त होतील, अशी भीती देखील रुहानी यांनी व्यक्त केली आहे. रुहानी यांनी आरोग्य विभागाच्या एका सर्वेक्षणाच्या आधारे हा आकडा सांगितला आहे. लोकांनी या रोगाला अत्यंत गांभीर्याने घ्यावं, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

मे महिन्यामध्ये इराणमधील कोरोना संक्रमण कमी होण्यास सुरुवात झाली होती. मात्र, त्यानंतर बाधित आणि मृतांच्या संख्येत हळूहळू वाढ होऊ लागल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. इराणची लोकसंख्या 8 कोटी आहे. अडीच कोटी लोक बाधित झाले असतील आणि आणखी साडे तीन कोटी बाधित होतील असा अंदाज रुहानी वर्तवली आहे. त्यातच अजून हर्ड इम्युनिटी मिळाली नसल्याचं राष्ट्रपती रुहानी यांनी सांगितलं. त्यामुळे इराणसारखा महत्वाचा देश हर्ड इम्युनिटीसाठी प्रयत्न करतोय का? असा प्रश्नही विचारला जातोय.

Leave A Reply

Please enter your comment!
Please enter your name here