आरोग्यासाठी निसर्गाकडे चला….

0
विश्व हिंदू परिषदेची ‘राजकीय वारी’!

आरोग्यासाठी निसर्गाकडे चला….

नही कैद रहना है मुझे इन चार दिवारों मे….
मुझे तो जीना है इस प्रकृति की हवाओं मे…
‘निसर्गाकडे चला’ या एका वाक्याचे अनेक अर्थ निघतात. तरी निसर्ग हे सर्वस्व आहे, यात दुमत नाही. निसर्गावाचून जगण्याची कल्पनाही आपण करू शकत नाही. म्हणूनच निसर्गाची महती आहे. निसर्ग म्हणजे सृष्टि तर ही सृष्टि पृथ्वी, पाणी, अग्नी, वायु आणि आकाश या पंचतत्वाने बनली आहे. या पाच तत्वात मानव विलीन झाला आहे. मनुष्य जन्म घेतो, वाढतो आणि मृत्यू पावतो अर्थात शेवटी विलीन होतो.

त्याची निसर्गाशी नाळ जुडलेली असते, तेव्हा निसर्गाला मानवांचा सोबती, गुरू, मित्र, देव तसेच डॉक्टरही म्हटले जाते. आता तर जगभरातील अनेक तज्ञ डॉक्टर रूग्णांना ‘निसर्गाकडे जावे’ असा सल्ला देत आहेत, अर्थात निसर्गच मोठा डॉक्टर आहे, असे सिध्द होते. अनेक देशातील डॉक्टरांनी रूग्णांना औषधीची चिठ्ठी लिहून देतांना निसर्गाकडे अर्थात जंगलात, समुद्र किनारी, डोंगरद-यात, नदीकाठी जाऊन इतके आठवडे, महिने रहावे, असा लेखी सल्ला देणे सुरू केले आहे. विदेशातील अभ्यासकांनी निसर्गातून काय व कसे मिळते, याचा अभ्यास केला.

त्याचे संक्षिप्त विवेचन सुप्रसिध्द डॉ. संग्राम पाटील इंग्लंड (मूळ जळगाव खान्देश) यांनी केले आहे. भारतीय संस्कृतित निसर्गाच्या विविध घटकांची पूजा केली जाते. त्याचे उपकार, ऋण मानले जाते, तर निसर्गाकडून देणे शिकावे, असेही म्हटले जाते. प्रत्येक ऋतूत सगळे काही देणारा निसर्ग, खूप काही शिकवत असतो. अशा या निसर्गात अनेक आजारांचे उपचार दडले आहेत. ते वनस्पती, कंद, मुळे खाऊनच होतात असे नाही तर सानिध्यानेही मिळतात, असा शोध जगभरातील संशोधकांनी लावला आहे. डॉ. संग्राम पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार युकेमधील स्कॉटलंड जवळचे शेटलंड या बेटावर निसर्गाची उधळण आहे.

युकेमधील आरएसपीबी नावाची संस्था निसर्गाबाबत प्रेम निर्माण व्हावे म्हणून काम करते. त्यांनी स्कॉटीश हेल्थ सव्र्हीस सोबत एक प्रोजेक्ट केला आहे. त्यांचेशी संबंधित डॉक्टरांची मते ९० मिनिटे निसर्गात अर्थात समुद्र किना-यावर किंवा जंगलात गेलात तर मेंदूच्या विशिष्ट भागात क्रिया बदल होतात. त्यामुळे नैराश्य, रक्तदाब, चिडचिड, क्रोधीवृत्ती सोबतच जुणे दुखणे कमी होते, तर प्रतिकारशक्ती (इम्युनिटी) वाढते. यालाच ‘नेचर प्रिसीक्रिप्शन’, म्हणतात. तर अमेरिकेतही असे उपचार काही डॉक्टरांकडून लिहून दिल्या जात आहेत.

जपानमध्ये एका अभ्यासानुसार १९८० ते १९८२ मध्ये ‘शेंद्रिन योकूब’ नावाचा उपक्रम राबविल्या गेला. यामध्ये जंगलात अर्थात निसर्गाच्या सानिध्यात जाऊन आंघोळ घेण्याचे फायदे दाखविले गेले. याचे प्रमुख तीन फायदे सांगतांना यामुळे रक्तदाब नियंत्रण व हृदयाचे ठोके योग्य होणे हा एक फायदा तर मानसिकतेवर चांगला प्रभाव हा दुसरा फायदा आणि प्रतिकारशक्तीत वाढ हा तिसरा फायदा सांगण्यात आला. त्यांच्या अभ्यासानुसार जे लोक ज्या आठवड्यात निसर्गात, जंगलात जातात, त्यानंतर त्यांचे नॅचरल किलर सेल (अ‍ॅन्टीव्हायरल व अ‍ॅन्टी कँसर सेल) एक महिनापर्यंत कार्यान्वीत (अ‍ॅक्टीव्हेट) होतात. त्यांच्या शरिरातील नैसर्गिक ‘स्टिरॉईड’ (क्वॉस्र्टीझॉल) कमी होते, त्यामुळे उच्च रक्तदाब कमी होतो तसेच नैराश्य कमी होते, मनस्थिती सुधारते, इन्झायटी कमी होते.

युरोपियन इन्व्हायरमेंटल पॉलिसीवर काम करणा-या संस्था, युरोपियन एजन्सीने २०० प्रकरणात अभ्यास केल्यानंतर काढलेल्या निष्कर्षाप्रमाणे ‘जे लोक हिरवळच्या संपर्कात असतात त्यांचे पोट कमी वाढते, ते आनंदी राहतात, त्यांचे नैसर्गिक मृत्युचे प्रमाण १६ टक्केने कमी होतात. जे लोक हिरवळीच्या ३०० मिटर परिसरात राहतात ते जास्त व्यायाम व काम करतात त्यांचे मानसिक आरोग्य (मेन्टल हेल्थ) चांगले राहते, वयोमान वाढते, असे आढळून आले आहे.

निसर्गाच्या सान्निध्याने वृध्दांचे आरोग्य चांगले राहते, गर्भार मातांच्या बाळाचे वजन (बर्थ वेट) चांगले असते, त्यांची एलर्जीक कंडीशन कमी असते, असेही इस्टन, युरोपियन, ब्रिटिश व अमेरीकेचे अभ्यासात समोर आले आहे.
प्रत्यक्षात योग, प्राणायाम, व्यायाम याने फायदे होतातच, मात्र त्या पलीकडे निसर्गात वेळ घालविणे, निसर्ग न्याहाळणे, यामुळे थेट परिणाम होतात. म्हणून आनंद, उत्साह व उर्जा प्राप्तीसाठी जे लोक वेळोवेळी निसर्गात जातात त्यांनी सातत्य ठेवावे, जे जात नाहीत त्यांनी जावे, असे डॉक्टर संग्राम पाटील यांचे आवाहन खूप ‘प्रॅक्टिकल’ आहे.

निसर्ग ही अमूल्य संपत्ती असतांना त्याचेवर मात करण्याच्या निर्धाराने, त्याचा -हास करण्याकडे मानवाची वाटचाल आहे. शेवटी निसर्गाचा -हास केल्यास काय होईल? हे सांगतांना एक शेर आठवतो….
नदी मर गई….पर्वत मर गए….
मरे हवा, पेड और मिट्टी भी….
हुआ परेशान फिर जो इंसान….
गुम हो गई सांस और जिन्दगी भी….

     - - - राजेश राजोरे

खामगाव. जि. बुलडाणा.

Leave A Reply

Please enter your comment!
Please enter your name here