आद.शरदरावजी पवार साहेब आता तरी तुमच्या एकलव्याचा आंगठा मागु नका तर राजकिय संधीचा हात द्या.

0

तळागाळापर्यंत पोहोचणारा निस्वार्थी कार्यकर्ता अण्णा धगाटे यांचे सामाजिक कार्य महाराष्ट्रा च्या कानाकोपऱ्यात तळागाळा तल्या समाज बांधवया पर्यंत पोहोचण्याची त्यांची धावपळ पाहता आजच्या तरुणाईला लाज वेल अशी त्यांची मानसिक शारीरिक क्षमता आहेत.त्यांची ही धावपळ केवळ सामाजिक प्रबोध नासाठी असते. समाज प्रबोधन व्हावे यासाठी त्यांनी सव्वाशे याच्यावर कथा लिहिल्या आहेत. त्यांचे कथाविश्व हे सामाजिक एकता,शैक्षणिक प्रगती,वैचारिक प्रगल्भता यावर आधारित आहे.

स्त्रियांच्या प्रश्नावर “तुझे आई होणे” हि स्त्रीला शाप की वरदान यावर स्त्रियांचा आत्मसन्मान वाढ विणारे आहेत.त्याचबरोबर आज ही अत्याचाराची शिकार होतआहे त्यावर तिने अबला न राहता सबला होणे त्यातून स्री सबली करण असा विषय त्यांनी नुकताच येऊन पुरा केला आहे.

राज्यातील पाणीप्रश्‍न पाहता महा राष्ट्रातील चारशे नद्यांची अभ्यास पूर्ण माहिती त्यांनी संशोधन करू न लिहिले आहे त्याचबरोबर पाण्याची समस्या सोडविण्याचे असेल तर “गाव तिथे तळे”झालेच पाहीजे शेती हा खरा या देशातील व्यवसाय असल्यामुळे गावाला विज पाणी रस्ते या समृध्दीतुन वैभव प्राप्त झाले तर राज्याला वैभव लाभेल हि त्यांच्या लिखाणा ची मुख्य संकल्पना आहे. त्याच प्रमाणे औद्योगिक विकास महा मंडळाचे पाणीप्रश्नावर होत अस णारे दुर्लक्ष व प्रदूषण कारणीभूत असणारे कारखाने यावर त्यांनी सखोल अभ्यास केला आहे. त्यावर दीन नदी प्रतिदिन फोडी टाहो हे त्यांचे पुस्तक लवकरच प्रकाशित होत आहे.

मराठा आरक्षण हेच सामाजिक परिवर्तन परिवर्तन हा त्यांचा मरा ठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे यावर अत्यंत वैचारिक असा लेख आहे.

अनेक शेतकऱ्यांच्या घरी राहून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत आहे त्यावर लिखाण करीत आहे त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना विचारले असता ते अभिमानाने सांगतात की माझे प्रेरणास्थान हे आदरणीय शरदरावजी पवार आहे.आदरणीय शरदरावजी पवा र साहेबांशी त्याचा 1978 पासून सामाजिक व राजकीय राजकीय विषयाबाबत पत्र व्यवहार झाले ला आहे पवार साहेब हे देखील अनेक वेळा त्यांच्या विचारांची दखल घेत आहे.

1980 झाली तर उत्तम अशी नोकरी सोडून ते आदरणीय पवार साहेबांच्या पक्ष कार्याला वाहून घेणार होते.आदरणीय पवार साहे बांनी त्यांच्या प्रापंचिक बाबीचा व उत्तम नोकरीचा विचार करता त्यांना सबुरीचा सल्ला दिला होता

आदरणीय पवार साहेबांच्या खासदारकीच्या लोकसभेच्या कारकिर्दीत ते हवेली तालुक्या तील बारामती मतदारसंघातील मतदार असल्यामुळे सन्मा अशो क मस्के,रामभाऊजी मोझे, बाळासाहेब लांडगे, प्रकाश मस्के, अण्णासाहेब पठारे,नारायणराव तापकिर , प्रताप दादा खांदवे पांडुरंगजी खेसे, विजयराव बाळासाहेब टिंगरे यांच्याबरोबर पदरमोड करून प्रचार करीत करीत फिरत होते. हे उत्तम चित्र कार असल्यामुळे स्वतःही भिंती वरील पक्षाच्या घोषणा चिन्ह रंगवुन पक्षाचे कार्य करीत होते.

असे ही बहुआयामी व्यक्तिमत्त्व त्यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे त्यांच्या मातंग समाजात एक आदरणीय असे वैचारिक प्रबोधन करणारे आहेत.व जेथे अन्याय येथे अण्णा असे समीकरण ठरलेले आहे.

आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्या तला मातंग समाज हा अण्णा धगाटे यांना एक विचारवंत म्हणून ओळखतो.

1976 साली दलीत स्वयंसेवक संघ महाराष्ट्रातील एक युवकांची संघटना स्थापन झाली होती.त्याचे ते संस्थापक सचिव होते. समाजा तील माजी गृहराज्यमंत्री सन्मा रमेशजी बागवे हे या संघटनेचे कोषाध्यक्ष होते या दोघांवर या संघटनेच्या उभारणीची मदार होती.संघटनेचे मास्टर माईन्ड म्हटले तर ते वावगे ठरणार नाही माजी मंत्री व भारस्कर यांच्या अण्णा भाऊ साठे संघर्ष समिती चे सचिव म्हणून कार्यरत होते. समाजातील अधिकारी वर्गाची विश्व मांगल्य ही संस्था या संस्थेचे सल्लागार म्हणून कार्यरत आहे.2020 हे वर्ष साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी वर्ष म्हणुन महाराष्ट्रात गौरवले जाणार आहे साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे जन्म शताब्दी प्रबोधिनी मंचच्यावतीने साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे जिवनावरील 100 लेखाचा गौरव ग्र॔थ प्रकाशीत करण्यात येणार आहे.तसेच सामाजिक समता प्रस्थापित होण्यासाठी 100 खेड्याना भेटी देणार आहोत या कार्याची धुरा अध्यक्ष या नात्याने अण्णा धगाटे संभाळत आहे.तसेच अण्णा धगाटे यांच्या 100 कथाचे प्रकाशन होणार आहे

सामाजिक एकता समता निर्माण व्हावी यासाठी त्यांनी त्यांच्या परिसरातील 75 हून अधिक ज्येष्ठ नागरिकांचा वृद्ध संग नागरिक प्रबोधिनी हा ज्येष्ठ नागरिक संघ स्थापन केला असून या संघात साठी राष्ट्रवादीचे माजी आमदार बापूसाहेब पठारे यांनी साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे हा पुरस्कार मिळवून दिला विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांनी या ज्येष्ठ नागरि क संघाच्या कामकाजासाठी उत्तम अशी इमारतीची जागा दिली आहे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी व पवार साहेबांना आदर्श मानून हा हरहुन्नरी व आजही तरूणांना लाजवेल असे काम करणारा निस्वार्थी अभ्यासू विचारवंत असा कार्यकर्ता उपेक्षितच राहिला आहे या उपेक्षित समाजात जन्मलेल्या उपेक्षित अशा कार्यकर्त्याला आता तरी त्यांनी न मागता त्यांना न्याय मिळावा हीच महाराष्ट्रातील समा ज समाज बांधवांची इच्छा आहे त त्यांची इच्छापूर्ती आदरणीय शरद रावजी पवार साहेब करतील त्यांची निवड साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामं डळ किंवा अण्णा भाऊ साठे स्मारक समिती किंवा आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे अभ्यास आयोग आयोग यावर यावर त्यांची निवड करतील

त्यांची निवड हि समाजाला योग्य न्याय दिल्याची भावना होणार असून असून समाजात एक जन जागृती निर्माण होईल

समाजातील एका अजातशत्रू व सर्वांना न्याय देणारा असा हा कार्यकर्ता त्याला आदरणीय पवार साहेब आदरणीय अजितदादा यांनी राजकीय संधी देऊन न्याय द्यावा अण्णा धगाटे यांना न्याय म्हणजेच उपेक्षित मातंग समा जाच्या विकासाला न्याय असे सार्थ ठरेल.

Leave A Reply

Please enter your comment!
Please enter your name here