आण्णा भाऊच्या स्मृतीस अभिवादन १८ जुलै २०२१ किर्तीवंत आण्णा भाऊचे जिवन

0
आण्णा भाऊच्या स्मृतीस अभिवादन १८ जुलै २०२१ किर्तीवंत आण्णा भाऊचे जिवन

आण्णा भाऊच्या स्मृतीस अभिवादन १८ जुलै २०२१ किर्तीवंत आण्णा भाऊचे जिवन

नव्हती जिवनाला उसंत ! जगणे नव्हते निवांत!तरी साहित्य शारदेचा महंत ! गगनभेदी शाहिरी गाजवी आसमंत ! साहित्यातला ऋतु वसंत! जन्म दारिद्यातला विचाराचा श्रीमंत! साहित्यरत्न होई किर्तीवंत ! अल्पकालातच झाला अंत! हिच आम्हा साहित्यिकाची खंत! साहित्यिक घालती स्मृती दिनी दडवंत !

आण्णा भाऊ आधी गेले नंतर जन्मले.आण्णा भाऊच्या जन्माचा विचार केला तर १ ऑगस्ट १९२० ते १८ जुलै 1969 १९६९ सालापर्यतचे जिवन म्हणजेच ४८ वर्ष ९ महीने १७ दिवसाचे आण्णाला जिवन लाभले.त्यांचे बालपण बालपणातला प्रवास कामगार चळवळीतील योगदान संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील लढा प्रचंड लिखाण या सर्वाचा विचार केला.

आण्णा भाऊ स्वतःसाठी किती,कसे,जिवन जगले असतील यांच्या जिवनाचा लेखाजोखा घेतला तर आण्णा भाऊ स्वतःसाठी जिवन जगलेच नाही. असे आण्णा भाऊ बद्दल म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.
आण्णाचे जिवनमान पाहता त्यांनी म्हटले असते.माझा न मी राहीलो हे देशा तुजला सर्व वाहीले हे म्हटले असते तर ते वावगे ठरले नसते.

एकुण आण्णा भाऊचे जिवनमान पाहीले तर १७०८०७ तासाचे त्यांचे जिवन दिवसाचे कालमान पाहीले तर १२ तासाचा दिवस १२ तासाची रात्र असे ढोबळमानाने आपण मानतो.त्यातही जन्माचा व मृत्युचा हा दिवस त्या व्यक्तीचा नसतोच.जन्मानंतरचा सहा महीन्याचा काळ या काळत केवळ आईची ओळख क्षुधा आणि तृष्णासाठी झालेली असते.

या काळात त्या जिवाला काही कळत देखील नसते.दिवस रात्र याचा विचार केला तर दिवसाचे तास ८९०३ त्यातला सहा महिन्याचा काळ ट्यॅ, ट्यॅ,करीत रडणे रांगणे यात जातो.मुलाचे पाय पाळण्यात दिसतात.असे म्हटले तरी जन्मापासुन किमान सहा महिने केवळ जगाकडे अनभिज्ञ राहुन पाहण्याचे असतात.

आण्णाच्या जिवनातील दिवसाचे ८९०३ तासाचा काळ या सर्वाचा विचार केला व आण्णा भाऊनी अहोरात्र कष्टच केले.खऱ्या अर्थाने जगण्यासाठी रात्रीचा दिवस केला.अहोरात्र झुंझार होऊन दारिद्रयाशी कडवी झुंजच देत राहीले.अक्षर शुन्यातुन,अक्षर भांडार उभे केले.कामगाराच्या चळवळीचा आखाडा!संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा लढा!

वाटेगाव ते मुंबई पायी प्रवास जे पाऊले पायी चालले तेच पाऊले पुढे विमानात बसुन रशियाला गेले हा सर्व जिवनातला काळ पाहता आण्णाचे जिवन हे तास काटा, मिनिट काटा,सेकंद काट्या प्रमाणे फिरत होते.घड्याळाचे काटे जसे विसावा घेतच नाही.सेकंद काटा फिरला कि मिनिट काट्याला त्याच्या बरोबर एक घर पुढे चालावेच लागते. मिनिट काटा फिरला की.त्याच्या बरोबर तास काट्याला एक घर पुढे चालावच लागत तेव्हा कुठे दिवस व दिवसातुन वर्षाची कालगणना होत असते.

आण्णाच्या जिवनाचा सतत फिरत असणाऱ्या काट्या प्रमाणे कालगणनेचा विचार केला.तर आण्णा स्वतःसाठी जिवनाचा उपभोग घेऊच शकले नाही.किवा उपभोगाचे जिवन त्यांच्या वाट्याला आलेच नाही.अशा या जिवनाला मग आम्हाला समर्पित जिवन म्हणावेच लागेल.अशा समर्पित जिवनापुढे आम्ही आपली कृतज्ञता हि अर्पित केलीच पाहीजे.

या विश्वात कोणी अंतराळाचा, वास्को डी गामा सारख्यानी देशाचा,कोणी धर्माचा शोध घेत असतो.आण्णानी मात्र मानतावादाचा शोध घेतला.

सुरवातीच्या काळात स्वतः निरक्षर असुनहि अक्षरातुन कामगार चळवळ साक्षर केली. ज्यांना अक्षर कळत होती.परंतु अक्षराचा अर्थ कळत नव्हता. सभोवारची परिस्थिती पाहून तोंडातुन अवाक्षर हि निघत नव्हते.अशाच्या संवेदना कथा कादंबरीतुन जाग्या केल्या.त्या कथा कादंबर्‍या केवळ वाचायला दिल्या नाहीत तर त्यातुन जगाकडे पाहायला शिकविले.जे जे आपणाशी ठावे ते ते इतराशी द्यावे.ज्ञानी करून सोडावे सकल जना,हेच आण्णानी केले आपल्या जवळचे ज्ञानाचे आगार जगापुढे खुले केले.जगाच्या२८देशात आण्णाचे साहित्य प्रकाशीत झाले आहेत.

जो स्वयेची कष्टत गेला,तोच जगी भला आण्णानी जिवनाचा जगण्याचा शोध घेतला.शोधातुन बोध दिला केवळ वाचकच नव्हे तर कवनातुन श्रोता हि सुबुद्ध केला.अंगात रक्त सळसळे लागले

सन १९३४ च्या दरम्यान रशियन क्रांतीचा इतिहास लिहीला गेला होता.तो इतिहास क्रांतिकारी असल्यामुळे ती पुस्तके सरकार जमा झाली होती.जप्त केली गेली होती.ती पुस्तके अण्णानी मिळविली.आण्णा ज्या वारणेच्या खोर्‍यात जन्माला आले होते.ज्या काळात व ज्या घराण्यात जन्माला आले होती ते सारी क्रांतीची खाण होती.त्या खाणीतले आण्णा अनगड पोलाद होते.या देशात सुरू असणारी स्वराज्याची क्रांती,धनदांडग्या कडुन भांडवलदाराकडुन होणाऱ्या कामगाराच्या शोषणा विरूध्द आवाज उठविणारी क्रांती संयुक्त महाराष्ट्रातील क्रांती चोहोकडे क्रांतीच क्रांती सुरू होती.क्रांतीच युगच होत.

त्यात आण्णाना रशियन क्रांतीचा जो रशियाच्या सरकारने जप्त करून ठेवला होता तो क्रांतीचा इतिहास आण्णानी वाचला आण्णाच्या पोलादी मनावर क्रांतीची धार चढली.क्रांतीकारक इतिहास घडविणारी समशेरच विचारातुन तयार झाली.मग काय प्रस्थापित व्यवस्थेवर वार करणारी समशेरी इतकीच धारदार लेखणी आण्णा चालवु लागले.या क्रांतीकारक इतिहासा बरोबरच काॅ.लेनिनचे चरित्र हि त्यांना मिळाले होती.ती त्यांनी मनचक्षुनी वाचली डोळ्यानी पाहिलेली अक्षर मनाने वाचली.असेच म्हणावे लागेल.

रशियाचा प्रवास लिहताना या सर्व क्रांतीच्या इतिहासाचा आण्णावर खोलवर परिणाम झाला होता. त्यातुनच रशियाच्या प्रवासाची ओढ लागली होती.केव्हा एकदा रशियाला जातो.असे आण्णाना झाले होते.नाना प्रकारे प्रयत्न करून त्यांनी दोन वेळा पासपोर्ट मिळवा.म्हणुन अर्ज करून पाहीले.त्याच वेळी त्यांना अनुभव आला.सत्ताधिश हा सत्तेच्या उन्मादात असतो.त्यात आण्णा हे कामगार चळवळीतले अग्रगण्य चळवळ म्हटली की,सत्ताधिशाशी विळ्या भोपळ्याच नात एवढच काय,

आण्णा सांगतात त्या मुख्य मंत्र्यान मला आधी विश्वासात घेतल.नंतर मधाळ शब्दात नकारच विषारी बीज पेरून विश्वासघात केला.व सुनावले व गरळ ओकली बाबा तु आमचा वैरी आहेस.एवढ्यावरचे ते थांबले नाही.तर त्यांनी आपली राजकारण्याची जात दाखविली.

आम्ही चांगली माणस म्हणत आमचा उदो उदो करीत त्यांनी स्वतःचीच पाठ स्वतः थोपटुन घेतली.आणि आण्णाच्या मनावर मात्र शब्दाचे वळ उठविले व ते म्हणाले,खर सांगु का,तुझी जागा तुरंगात आहे.या शब्दाने आण्णा व्यथित झाले. शरिराची लाही लाही झाली होती.पण सत्तेपुढे शहाणपणा कामाचा नव्हता.त्याच वेळी त्यांना पटले होते.

ज्यांच्याकडे अधिकार आहे त्यांच्या पुढे आणी गाढवाच्या मागे उभे राहु नये.तो काळ होता १९४८ सालचा प्रसिद्ध अभिनेता बलराज सहानी यांनी आण्णाच्या पॅरिस येथे जाणाऱ्या प्रवासाची तिकेटे काढली होती.पॅरिस येथे जागतिक शांतता परिषद होती.व तिचे निमंत्रण त्यांना होते.एवढी महान संधी होती.पण राजकर्त्याच्या अविचारी मनोवृतीने ती हुकली.

हि संधी म्हणजे जिवनातल्या तारूण्याच्या उंबरठ्यावरची वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी मिळालेली होती.या वयात जागतिक नकाशावर पॅरीस कोठे आहे.ब्रिटिश सत्तेचा अस्त व स्वदेशी सत्तेची सुरवात या वेळी शांतता शोधावी लागत होती.अशा वेळी थेट शांतता परिषदेच तेही पॅरिस मधील किती महानता मिळविली होती.

आण्णाची महानता पॅरिस मधल्या मध्ये समजली होती.परंतु या देशाच्या कपाळ करंट्या राजसत्तेला समजली नव्हती. दुर्दैवाने त्यावेळी देशात लोकशाही हा परवलीचा शब्द अस्तितावात आला नव्हता.अन्यथा लोकशाहीलाही दोष द्यावा लागला असता व विचारावे लागले असते हिच का लोकशाही.

पुढे १९६१ साली तेरा वर्षानी आण्णा पुन्हा परदेश गमनाची स॔धी त्यांच्या कतृत्वाने पुढे चालुन आली १९६१ सालीच त्यांच्या फकिरा या कादंबरीला महाराष्ट्र शासनाचे पहिले पारितोषिक मिळाले त्याच वेळी इण्डो सोविएत कल्चरल सोसायटीने अण्णाना रशियाला पाठविण्या निर्णय घेतला होता.संयुक्त महाराष्ट्र राज्य १मे १९६०ला अस्तित्वात आले होते. चळवळीला काही अंशी उसंत मिळाली होती.खरे तर चळवळ हा प्रवाह कधी थांबणारा नसतो.

मानवाच्या जिवनात प्रांत रचना, समाज रचना,समाज व्यवस्था अर्थकारण,विषमता,अन्न,वस्र निवारा अशा अनेक समस्या असतात त्या व्यक्ती म्हणुन सोडवायला जेव्हा अपुरा पडतो.तेव्हा ती कृती सांघीक स्वरूपाची असते.त्यातुन लढा उभारला जातो.तीच चळवळ आण्णा भाऊनी पुढे संयुक्त महाराष्ट्राची कामगाराची चळवळ म्हणुन सुरू ठेवदी अशा अनेक चळवळी आण्णाच्या जिवनात
होत्या.

चळवळीतली आण्णा भाऊची भुमिका हि अत्यंत महत्वपूर्ण होती.त्यात कवन,शाहीरी वगनाट्य असे कार्यक्रम राबविले जायचे.कित्येक वर्षाचा,कित्येक भाषणाचा अर्थ जनते समोर मांडुन अर्थ सांगितला जातो.

जन क्रांती निर्माण होत असते. प्रस्थापिता विरूध्द बंड उभारले जाते.तीच क्रांती आण्णा भाऊ समाजात घडवित होते.त्यांच्या शाहीरीचे बोल त्यांच्या पहाडी आवाजा बरोबर शाहीर अमरशेख,गव्हाणकर यांच्या पहाडी आवाजाने ती गगनभेदी ललकारी उतुंग पहाडासारखी उभी राहुन विरोधकाना भेदुन जात होती

त्यातुनच १ मे ला १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. आण्णा काही अंशी चळवळीतुन निवांत झाले होते.त्यामुळेच इंण्डो सोविएत कल्चरल सोसायटीचे निमंत्रण मिळताच रशियाला जाण्याची तयारी आण्णाला करावी लागली.तन मन तयार झाले परंतु धन तयार नव्हते.असे असले तरी हि परिस्थिती क्षणिक राहीली.आण्णाचे कतृत्व, व्यक्तीमत्व एवढे महान होते. शेतकऱ्यांने पेरलेल्या बियावर ते उगवण्यासाठी पावसाची बरसात व्हावी.व बी जमिनीतुन जोमाने उगवून यावे.तसेच झाले.काही कालावधीतच पैश्याची बरसात सुरू झाली.

अर्थकारणाची तोंड मिळवणी झाली.प्रयत्नांती कण रगडता. वाळूचे तेल ही गळे तशी पासपोर्टची व्यवस्था झाली. पासपोर्ट हाती पडला.रशियाला जाणारे विमान आकाशात भरारी घेणार होते.ते आकाश आता आण्णानां ठेंगणे वाटु लागले. जिवनाच कथानक असणारा एखादा चित्रपट डोळ्यासमोर उभा राहावा तशी रशिया डोळ्यापुढे उभी राहु लागली.

कल्पनाच्या क्षितिजापुढे हि जाणार होते.नवख्याला एखादा मार्गक्रमण करायचा असला तर मार्गदर्शक हा असावाच लागतो. शाहीर द.ना.गव्हाणकरानी आण्णानां समोर बसवुन रशियाला कोठे काय बघायचे, काय बोलायचे याचे मार्गदर्शन केले.एवढे मार्गदर्शन होऊन हि आण्णा पुढे प्रश्न निर्माण होत होते.ते स्वतःशीच विचार करीत होते.

मी मुंबई ते सातारा हा प्रवास कधी एकट्याने करीत नाही.आता रशियाला जायचे ते हि मातृभुमि माझी जन्मभुमी आप्तइष्ट सगे सोयरे यांना सोडुन एकटाच मी, एकटाच हे आण्णानां मनापासुन अवघड वाटत होते.माणसाच मन आणि वारा हे जसे माणसाला हवे त्या ठिकाणी त्याच्या आधी पोहचतात तशीच आण्णाची किर्ती देखील आण्णाच्या आधी रशियात पोहचली होती.रशियाने तर जगातील महान लेखक मॅक्झीम गाॅर्कीच्या बरोबरीचा सन्मान देऊन ती उपाधी देखील दिली होती.

दुसऱ्या महायुद्धातील सोविएत जनतेच्या पराक्रमाचे जे शौर्य होते.त्या पराक्रमाचे वर्णन उत्स्फुर्तपणे आण्णानी स्टालिनग्राडच्या लढाईचा पोवाडा लिहला होता.सोविएतच्या लाल सैनिका बरोबर बर्लिन पर्यत पोहचला होती.आता तर आण्णा स्वतः मास्को पर्यत जाणार होते. ते हि सन्मानाने इंण्डो सोविएत कल्चरल सोसायटीच्या शिष्ट मंडळात त्यांना प्रतिनिधित्व मिळाले होते.आण्णा मुंबई ते दिल्ली देशार्तंगत एकटेच जाणार होते.याचाच अर्थ महाराष्ट्र राज्यातुन ते एकमेव प्रतिनिधि म्हणून जात होते.

पुढे इतर राज्यातील सभासद त्यांना दिल्लीतुन भेटणार होते. सोविएत देशाबद्दल असणारी सर्वाची विचारधारा परंतु एक दुसर्‍याने एकमेकाना कधी पाहीले नव्हते.ज्या परिषदेसाठी ते चालले होते.त्या परिषदेत असणारी विचारधारा सर्वाच्या ओळखीची होती.परंतु व्यक्ती म्हणुन चेहऱ्याने
एक दुसर्‍याशी अनोळखी होते.ना आण्णाना कोणी ओळखत होते ना आण्णा कोणाला ओळखत होते.

घरापासून विमानतळापर्यत आण्णा शाही थाटात निघाले होते.मित्रपरिवार आप्त स्वकिय यांचा त्यांच्या भोवती गराडा पडला होता.त्या सर्वाच्या भावना एकच होत्या.माझे आमचे अशा अनेक नात्याने असणाऱ्या मायेच्या ओलाव्यात तेच ते रशियाला जात असणारे होते. कौतुकाचे बोल होते.भावनाचा तो भवसागरच दाटला होता.या भावनाचा परिमल रशिया पर्यत पोहचावा म्हणुन बहुतेकानी फुलाच्या माला आणल्या होत्या. त्या माळानी त्यांचा गळा भरला होता.त्या ओझ्याने आण्णाचा गळा आनंदाने दाटुन आला होता.आज मात्र आण्णाच्या जाण्याने आमचा कंठ दुःखाने दाटुन आली हिच आण्णाच्या जिवनातली सुख दुःखाची वाटचाल यालाच जिवन असे नाव

जेष्ठ,लेखक,कवी,साहित्यिक,कथाकार:अण्णा धगाटे

Leave A Reply

Please enter your comment!
Please enter your name here