आठवणीतील दिवाळी !!!!

0
आठवणीतील दिवाळी !!!!

आठवणीतील दिवाळी !!!!

आजच्या दिवशी सकाळी6 वाजता आईने झोपेतून उठविले तेव्हढ्यात बापूने म्हणजे वडिलांनी सांगितले बूट पोलिश कर पोलिसांना कुठलाही सण असला तरी जनतेच्या सेवे साठी जावेच लागते त्यानी युनिफार्म चढविला होता व माझे कडे पहात होते ते निघून जातात आईने गरम पाणी टाकले होते उटणे सोबत दिले होते आणि जवळचा शेत बांध वरून आणलेले चिरांठु घेतले तोपर्यंत बहीण -भाऊ उठले तो पर्यन्त मला चाळीतील 3 नंबर रम मधील पवार मावशी कडे एक पातेले घेऊन जाण्यास सांगितले पवार काका हे पोलादपूर चे आणि बापूचे सहकारी पवार मावशीने गव्हाचे पीठ दिले आम्ही तांदुळ भात-भाकरी खाणारे पुढे पवार काकांचा अपघाती मृत्यु झाला आमचा आधार तुटला मावशींना पोलीस अधीक्षक यांनी अलिबागला कार्यलयात नोकरी दिली त्याचे 3 भाऊ पोलीस दलात कार्यरत आहेत आजही मी पोलादपूरला गेलो तर नतमस्तक होतो अशीही परोपकारी माणसे असतात अश्या आठवणी.

आमची1 बहिण आणि 3 भाऊ अतिशय सुख समृध्द आहेत.कपाटातून आईने नवे असलेले जुनेच कपडे दिले,आणि रात्री केलेल्या फक्त शंकरपाळी फराळ दिली व सांगितले कोणी चाळीतल्यानि विचारले तर सांगायचे चकली,करंजी,लाडू खूप झाले,छोटे भाऊ बहीण बाहेर फटाके म्हणजे टिकल्या फोडाव्यास गेले ,मी मोठा असल्याने बापू दिवाळीचे समान काल आणणार होते ना? नाहिरे त्यांना ऍडव्हान्स मिळाला नाही त्या काळात दिवाळीला 200 रुपये मिळत असायचे ते पैसे अलिबाग मुख्य कार्यालयातुन आले नव्हते. दिवाळीच्या दिवशी आम्ही शाळेच्या पटांगणात मित्र एकत्र भेटायचो त्या मध्ये नंदू लोहार एम ए बीएड होऊन मुख्याध्यापक म्हणून निवृत्त होऊन

गावी शेती करतोय आजही फोनवर संपर्क ठेवलाय, कोण तो आनंद आमचा खालापूरचा प्रकाश जंगम तो येताना पिशवीत त्याच्या आईने केलेली दिवाळी आणायचा मी जरा जास्तच हात मारायचो कारण त्याची आई सुगरण होती नंतर प्रकाश रायगड जिल्हा परिषद मध्ये स्टोअर किपर होता आता निवृत्त झाला,आजही त्या बाजूला गेलो तर वहिनी,सुनबाई आदर तिथ्य करतात आठवणीभाऊ बीजेच्या अगोदरच्या दिवशी बापूंच्या भल्या मोठ्या पिशव्या सामानाच्या हसत हसत आणल्या होत्या

मी आणि बहीण मदत करू लागलो कारण उद्या मामा येणार सायंकाळी मित्रात चर्चा झाली उद्या घरात 3 महिन्याने महागडे बोकडाच्या मटनावर ताव मारणार,आणि सकाळी मामा आले आम्ही सारे भावंडे आनंदी झालो खूप खाऊ ,आजींनी दिलेली दिवळीवर आम्ही तुटून पडलो आणि तृप्त झालो अशी आमच्या 50 वर्षपूवी पोलिसांच्या पोराची दिवाळी होती,आज परिश्रम, अभ्यासाच्या जोरावर हेही दिवस गेले सध्याचा काळात रोजची दिवाळी पण प्राथमिक शिक्षण काळात अनुभवलेली आठवणीतील दिवाळीची आठवण डोळयातून अश्रू अनावर होतात (माझ्या “पोलिसाचा पोर” या जीवन प्रवासातील उतारा आहे)-रायगड भूषण जेष्ठ पत्रकार जयपाल पाटील मो.9673727277

Leave A Reply

Please enter your comment!
Please enter your name here