अबालवृद्धांचं सायकलवरचं प्रेम वाढत चाललेलं, युवकांना उर्जेचा स्त्रोत !

0
अबालवृद्धांचं सायकलवरचं प्रेम वाढत चाललेलं, युवकांना उर्जेचा स्त्रोत !

अबालवृद्धांचं सायकलवरचं प्रेम वाढत चाललेलं, युवकांना उर्जेचा स्त्रोत !

बारामतीत आजकाल
अबालवृद्धांचं सायकलवरचं प्रेम वाढत चाललेलं आहे हे नवीन युवक वर्गाला प्रेरणा देत उर्जेचा स्त्रोत बनतं आहे !

२१/३/२१, रविवार,जागतिक वनदिन ,फाल्गुन शु.७,शुभदिवस, शुभसकाळ ,भानुसप्तमी आणि जमशेजी नवरोज दिनानिमित्त आज इथं आणखी काही लिहायला सुरुवात केली आहे.जवळपास महिना- दीड महिन्याच्या आंतरानं आज बारामती सायकल क्लब च्या सभासदांसोबत बारामती- पणदरे – बारामती ३५ की मी पर्यंत सायकल राईडचा मनमुराद आनंद लुटला ६० ते ६५ जणांचा लहान मुलं मुली बायका माणसांनी खचाखच सायकली उभ्या केल्या बरोबर६.३० ला नटराज नाट्य मंदिरापासून सुरूवात केलेली.आज श्लोक श्रीनिवास वायकर वय वर्ष‌‌‌ ६ त्याच्या छोट्याशा चीमुकल्या सायकल सोबत पणदरे खिंडीपर्यंत त्यानं केलेली सायकल राईड येणारी पीढी आवर्जून घडवायला सुरुवात होईल.पणदरे एसटी बसस्थानकातील मिसळपाव आणि वाफाळलेला आल्लमिश्रीत चहाचा एक एक घेतलेला घोट सायकलचीही गोडी वाढवायला पुरेसा ठरला.आज पंप मुद्दामहून घेतला त्याचा फायदाच झाला .

तीन – चार जणांनी पंपाचा वापर केला.हळुहळु सायकलचं लावलेलं रोपटं एका वटवृक्षात त्याचं झालेलं रूपांतर पाहिलं आणि क्षणभर देहभान विसरुन गेलो होतो.अबालवृद्धांचं सायकलवरचं वाढत चाललेलं प्रेम एक नवीन उर्जेचा स्त्रोत देऊन जातोच पण सायकल वापराविषयीचे आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यास झालेला उहापोह वाखाणण्यासारखा होता.आज जागतिक वनदिवसानिमित्त इथं आणखी काही लिहायला नमूद करायला नक्कीच आवडेल.झाडं लावली की शुद्ध हवा मिळेल ,हवा मिळाली की पाणीसुद्धा मिळेल.जमीनीत ओल टिकून राहिल वृक्षसंवर्धनामुळं पशुपक्षी सुद्धा त्या वृक्षांच्या फांद्यांत आपली घरटी बनवतील .पर्यावरण उत्तम तर आरोग्यही उत्तमच राहण्यास एकप्रकारे मदतच होईल.टू – व्हीलरचा वापर टाळा सायकल चालवा पर्यावरण वाचवा. होय मी जबाबदार !!

माझा मास्क माझी सुरक्षा!! सुरक्षीत अंतर ठेवा!! मास्कचा वापर करा!! सेनीटाईझरचा वापर करा!! YES I AM RESPONSEBLE!! MY MASK MY SAFETY!! KEEP SOCIAL DESTENCE!!! MASK IS NES SORRY COMPLSORRY!! USE SANNITIZER ( SMS) आत्तापासूनच पर्यावरण वाचवण्याची प्रार्थना करु आणि सायकलच्या वापराचा संकल्प करा .आज इथंच थांबतो उद्या पुन्हा भेटूया नवीन विचार मांडायला,” सायकल चालवा पर्यावरण वाचवा पाणी इंधन कील्ले वाचवा झाडे लावा झाडे जगवा मुली वाचवा मुली शिकवा रक्तदान सर्वश्रेष्ठ दान प्लास्टीकचा वापर टाळा सर्वसामान्य माणूस वाचवा आपली पृध्वी वाचवा,”. DRIVE CYCLE SAVE ENVIRONMENT SAVE WATER FUEL FORT SAVE GIRLS EDUCATED GIRLS DONATE THE BLOOD DONATION AVOID USING PLASTIC SAVE COMMEN MAN SAVE OUR EARTH!! 🚴🏻‍♂️🚴🏻‍♂️🚴🏻‍♂️🚴🏻‍♂️🚴🏻‍♂️

Leave A Reply

Please enter your comment!
Please enter your name here