अजित पवार यांच्या वाढदिवसा निमित्त कोरोना योध्याचा सन्मान

0
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसा निमित्त शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेस व नगरसेविका सुरेखा चौधर च्या वतीने कोरोना योध्याचा सन्मान रुई ग्रामीण

अजित पवार यांच्या वाढदिवसा निमित्त कोरोना योध्याचा सन्मान

बारामती: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसा निमित्त शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेस व नगरसेविका सुरेखा चौधर च्या वतीने कोरोना योध्याचा सन्मान रुई ग्रामीण रुग्णालय येथे करण्यात आला.
या प्रसंगी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, नवरसेविका सुरेखा पांडुरंग चौधर , शहर राष्ट्रवादी चे अध्यक्ष इम्तियाज शिकलकर, तहसीलदार विजय पाटील,उपमुख्यमंत्री कार्यालय चे अधीक्षक हनुमंत पाटील व शिवाजीराव भोसले,शब्बीर शेख,गोरख चौधर,अजिंनाथ चौधर,मधुकर शिरसट व पांडुरंग चौधर आदी मान्यवर उपस्तीत होते.

कोरोनाच्या महामारीत स्वतः च्या जीवाची व कुटूंबियाची पर्वा न करता रुग्णांसाठी दिवस रात्र सेवा देणारे रुई ग्रामीण रुग्णालयातील सर्व डॉक्टर, नर्स,लेखनिक,ड्रायव्हर,सुरक्षा कर्मचारी आदी मुळे कोरोना वर पहिल्या व दुसऱ्या लाटेत अनेकांचे जीव वाचवू शकलो म्हणून त्या सर्वांना कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित करने व त्यांचा आत्मविश्वास वाढविणे हे आपले कर्तव्य असल्याचे मान्यवरांनी मनोगत मध्ये सांगितले.
या वेळी रुई ग्रामीण रुग्णालय चे वैदकीय अधीक्षक डॉ संजय दराडे व सर्व अधिकारी,कर्मचारी,सेवक आदींना कोरोना योद्धा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

कोरोना योद्धा पुरस्कार मुळे काम करण्यास प्रोत्साहन मिळाले व येणाऱ्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी काळजी व दक्षता घेण्याचे आव्हान डॉ संजय दराडे यांनी केले .सूत्रसंचालन अनिल सावळेपाटील यांनी केले तर
स्वागत नगरसेविका सुरेखा चौधर यांनी केले तर आभार प्रदर्शन पांडुरंग चौधर यांनी मानले.

Leave A Reply

Please enter your comment!
Please enter your name here