देशातील तरुणांनी खचून न जाता अच्युत पाटीलचा कित्ता गिरवून आत्मनिर्भर होणे गरजेचे

0
देशातील तरुणांनी खचून न जाता अच्युत पाटीलचा कित्ता गिरवून आत्मनिर्भर होणे गरजेचे

देशातील तरुणांनी खचून न जाता अच्युत पाटील चा कित्ता गिरवून आत्मनिर्भर होणे गरजेचे ! जेष्ठ संपादक :जयपाल पाटील

अच्युत पाटील सारखा धडा घ्यावा. तरुणांनी खचून न जाता आत्मनिर्भर होणे गरजेचे आहे अशाच जिद्दी तरुणांमुळे देश प्रगती पथावर निश्चितच जाईल !

आत्मनिर्भर !!!! सायंकाळी 5 वाजता पेण वरून मुंबई-गोवा महामार्गाच्या वाशी नाक्यावर खूप जणांची गर्दी दिसली तर कशासाठी? मासे खरेदीसाठी मीही मासे खवय्या असल्याने सहकाऱ्याला गाडी पुन्हा वळविण्यास सांगितली आणि तेथे पोहोचलो जो तो भाव करून ताजे मासे खरेदी करीत होता. सहज माझे लक्ष गेले शिकलेला तरूण दिसत आहे आणि त्याच्या मागे महागडी चार चाकी गाडी उभी असून त्यामध्येही मासे ठेवण्याचे बकेट दिसले माझेही कुतूहल जागे झाले पत्रकार म्हणून जरा माहिती घेऊया आता गिर्‍हाईक कोणी नव्हते. मी ही संधी साधुन त्याच्यासोबत हितगूज सुरू केले प्रश्न- काय नाव ? उत्तर-मी अच्युत गजानन पाटील प्रश्न -आपले गाव कोणते?

शिर्की, तालुका पेण प्रश्न -आपण मच्छी व्यवसाय कधीपासून करता उत्तर- तसे माझे गावी शेततळे आहे कोविड मुळे शेततळ्या कडे गावातील खरेदीदार, गावात आलेले पाहुणे फिरकेनासे झाले मग विचार केला आपली एवढी महागडी गाडी आहे तिचा वापर करुया आणि ताजी मासळी वाशी नाक्यावर येथे विकायचा निर्णय घेतला दररोज दुपारी 4 वाजता मी येथे येतो प्रश्न- तुझे शिक्षण किती झाले व यापूर्वी काय काम करीत होतास उत्तर- सर माझे शिक्षण 12वी पास झालेले असून मी यापूर्वी कंत्राटदार म्हणून काम करीत होतो कोविड-19 मुळे मला कामे मिळायची बंद झाली आणि देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे यांनी तरुणांनी करोना काळात स्वतःसाठी उद्योगधंद्यात गुंतावे म्हणून मी आमच्या समाजाचा पारंपरिक मच्छी व्यवसायात उतरलो आहे.

आणि समाधान मिळते आहे प्रश्न- हे सारे करताना काही सामाजिक भूमिका आहे का? उत्तर -मला अभिमान आहे मी शिवसेना पेण शहर संघटक म्हणून जनसेवा करतो आणि आणि गावच्या म्हणजेच शिर्की ग्रामपंचायतीचा सदस्य म्हणून काम पाहतो आणि ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थांची सेवा करतो हे ऐकून त्याचे मी अभिनंदन केले आणि माझी त्याला ओळख सांगितली मित्रांनो अतिशय विनयशील पणे त्याने आपली माहिती सांगितली आपला पारंपरिक व्यवसाय करताना तरुण-तरुणींनी लाजू नका असे मला आपणास सांगावेसे वाटते आपत्ती कधी केव्हा कशी येईल ते सांगता येत नाही यासाठी कशाचीही तमा न बाळगता कष्ट करण्याची हिंमत असेल तर जीवनात हे ही दिवस जातील आणि अच्युत पाटील सारखा धडा घ्यावा. तरुणांनी खचून न जाता आत्मनिर्भर होणे गरजेचे आहे अशाच जिद्दी तरुणांमुळे देश प्रगती पथावर निश्चितच जाईल त्याबद्दल त्याचे हार्दिक अभिनंदन =रायगड भूषण, ज्येष्ठ पत्रकार जयपाल पाटील आपत्ती सुरक्षा तज्ञ

Leave A Reply

Please enter your comment!
Please enter your name here