अखिल भारतीय योगशिक्षक महासंघाच्या वतीने शाळा महाविद्यालयात दिले जाणार योगाचे धडे

0
अखिल भारतीय योगशिक्षक महासंघाच्या वतीने शाळा महाविद्यालयात दिले जाणार योगाचे धडे
जिल्हा क्रिडाधिकारी नाशिक यांना देखील अ. भा. यो. म. नाशिक जिल्हा कार्य समिती च्या वरील पदाधिकारी यांच्या हस्ते निवेदन देताना.,

अखिल भारतीय योगशिक्षक महासंघाच्या वतीने शाळा महाविद्यालयात दिले जाणार योगाचे धडे

फ्रॉम:सुभाष पवार-प्रतिनिधी, मीडिया विभाग प्रमुख

दि 21 जूनला संपन्न होणाऱ्या सातव्या आंतरराष्ट्रीय दिनाचे औचित्य लक्षात घेऊन अखिल भारतीय योगशिक्षक महासंघाच्या वतीने जिल्ह्यातील शाळा,महाविद्यालयात योगाचे धडे दिले जाणार असल्याची माहिती महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्राचार्य यु.के.आहिरे यांनी दिली.

बालकांना उत्तम आरोग्य व त्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी तसेच सध्याच्या भीषण महामारीच्या काळात संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी प्रत्येक शाळा,महाविद्यालयात तसेच इतर अन्य ठिकाणी तज्ञ योगशिक्षकांमार्फत योगाचे धडे देण्याचे ठरवले असून मुलांच्या आरोग्यासाठी या कार्यास शिक्षण विभाग व जिल्हा प्रशासन यांच्या परवानगीसाठी महासंघाच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.

जिल्हा शिक्षणाधिकारी डॉ. सौ.वैशाली झनकर व जिल्हा क्रीडाधिकारी यांना जिल्हाध्यक्ष उत्तमराव कचरू आहिरे,उपाध्यक्ष अशोक पाटील,प्रसाद कुलकर्णी, महासचिव वैशाली पाटील संघटन सचिव भरती सोनवणे,संयुक्त सचिव सुषमा साळुंके, सचिव किशोर भंडारी,गीता कुलकर्णी यांच्या वतीने देण्यात आले आहे.यावेळी महासंघाच्या ह्या स्तुत्य उपक्रमास शिक्षण विभागाने होकार दिला आहे.

Leave A Reply

Please enter your comment!
Please enter your name here